![]() |
उक्कलगाव : गरीब वंचित घटकांतील आदिवासी कुटुंबांना सामजिक बांधिलकी जपत श्री कृष्णार्पण संस्थेच्या वतीने किराणा व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.(छाया : पप्पू बोर्डे) |
साईकिरण टाइम्स ब्युरो, 5 एप्रिल 2020
श्रीरामपूर, विशेष प्रतिनिधी (भरत थोरात) देशात सध्या कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊन असल्याने रोजचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दैनंदिन व्यवहार ठप्प झाले आहे. मात्र ज्याकडे उपजीविकेचे कोणतेही शाश्वत साधन नसणार्या समूहावर आजवर उपासमारीची वेळ आली आहे. देशातील विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून पुढे येत आहे. अशाच श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव येथील श्री कृष्णार्पण संस्थेने पुढाकार घेत आदिवासी समाजातील दुर्बल घटकांतील गरीब वंचित असणार्या कुटुबांना किराणा व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करत घर पोहोच केला जात आहे.
सामजिक जाणीवेतुन श्री कृष्णार्पण संस्था उक्कलगाव यांच्या वतीने सामजिक बांधिलकी जपत किराणा मालाचे व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. केंद्र सरकार व राज्य सरकार यांनी दिशा निर्देशित केलेल्या नियमांचे पालन काटेकोरपणे करत प्रबोधन केले. विविध क्षेत्रात कृष्णार्पण संस्थेचा कायमच पुढाकार घेतला जातो. यावेळी संस्थेच्या वतीने गणेश थोरात गिरीष मोरे हरिष मोरे शिरीष मोरे आदींसह संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.