श्रीरामपूर : करण ससाणे यांचा कोरोना विरोधात विजयी गुढी उभारुन संकल्प


श्रीरामपूरातील परिस्थिती प्रशासनाने उत्तमरीत्या हाताळली : करण ससाणे 

साईकिरण टाइम्स ब्युरो, 25 मार्च 2020
श्रीरामपूर | जगभर तांडव करीत असलेले कोरोनाच्या विषाणूला हरविण्याची  विजयी संकल्प गुढी श्रीरामपूर नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष  करण ससाणे यांनी आपल्या परिवारातील  श्रीरामपूर येथील घरात उभारत,  पाडव्याच्या निमित्ताने श्रीरामपूरातील लोकांनी शासन आणि आरोग्य विभागाकडून देण्यात येत असलेल्या सूचनांचे पालन करुन आपण कोरोनाला हरवू, असा संकल्प करण्याचे आवाहन  करण ससाणे यांनी केले आहे.

             साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या गुढी पाडव्याला अनन्य साधारण महत्व आहे. अनेक चांगल्या कामांची मुहूर्तमेढ या दिवशी रोवली जाते. अनेक जण नवीन खरेदी किंवा नव्या कामाची सुरुवात पाडव्याच्या मुहूर्तावर करतात. सध्या देशासह जगभरात कोरोना या विषाणूंची लागण मोठ्या प्रमाणावर झाली असुन या विषाणूवर सध्या कोणतीही लस उपलब्ध नसली तरी या जिवघेण्या रोगापासून स्वतःचे आणि इतरांचा बचाव करु शकतो.
    श्रीरामपूरातील प्रशासन उत्तमरीत्या परिस्थिती हाताळत आहे त्यामध्ये महसूल अधिकारी, पोलीस यंत्रणा, नगरपालिका  , डॉक्टर आणि सर्वच ज्ञात- अज्ञात अनेक हात दिवस रात्र मेहनत घेत आहे, त्यांना सहकार्य करा असे आवाहन करण ससाणे यांनी केले आहे.
            या कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी फक्त आपल्या संयमाची गरज असून विनाकारण घराबाहेर पडू नका, वारंवार हात धुवा, तोंडाला मास्क लावा, संचारबंदीच्या  काळात पोलीस व प्रशासनाला सहकार्य करा, या रोगापासून फक्त आणि फक्त तुम्ही स्वतःच बचाव करु शकतो. आपण वेळीच खबरदारी घेतली नाही आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन केले नाही तर या भयानक रोगापासून आपण कोणीच वाचवू शकणार नाही.त्यामुळे खबरदारी घ्या आणि घरात बसा असे करण ससाणे यांनी म्हटले आहे. 

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post