Shrirampur | रेल्वे बोगी फोडुन गव्हाची पोती लूटली

प्रातिनिधिक छायाचित्र 

साईकिरण टाइम्स ब्युरो, 10 एप्रिल 2020

श्रीरामपूर | प्रतिनिधी | आज शुक्रवारी दुपारी 2 ते 4 वाजेच्या दरम्यान  दिवसा ढवळ्या  आऊटर सिग्नल वर उभी असलेल्या मालगाडीच्या एका भोगीचे दार फोडून त्यातील गव्हाची पोती लुटून नेण्याचा गंभीर प्रकार श्रीरामपुरात घडला. 


         या प्रकाराबद्दल शहरात सध्या उलट-सुलट चर्चा सुरू आहे. दुपारी पूणतांब्याकडून येणारी  एक मालगाडी धान्याच्या पोत्यांनी  भरलेली होती. सदरची गाडी सूतगिरणीच्या पुढे आल्यानंतर सिग्नल नसल्यामुळे आऊटरला थांबली.  बजरंग चौक ते गोपीनाथ नगर भुयारी पूल दरम्यान रेल्वेच्या एका भोगीचे दार  लोकांनी तोडले व त्यातील  गव्हाच्या पोत्यांची यथेच्छ लूट केली .

              सायंकाळी उशीरा रेल्वे पोलीस व शहर पोलीसांनी या भागातून दोन संशयित ताब्यात घेऊन तपास सुरु केल्याची चर्चा दबक्या आवाजात शहरात सर्वत्र होत आहे .

Rajesh Borude

2 Comments

Previous Post Next Post