श्रीरामपूर : नगरपालिका शाळा क्रमांक ३ येथे ८० वा स्वातंत्र्य दिन मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. देशभक्तीपर वातावरणात विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी विविध महापुरुषांच्या वेशभूषा धारण करून त्यांच्या कार्याला अभिवादन केले.शाळेच्या प्रांगणात मा. आ. भाऊसाहेब कांबळे यांच्या हस्ते, मुख्याध्यापिका स्मिता गायकवाड यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी संगीतमय कवायत संचलन सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व सांगणारी मनोगते व्यक्त केली.
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून शाळेत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांतील विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. तसेच नगरपरिषदेमार्फत घेण्यात आलेल्या वृक्षारोपण स्पर्धेअंतर्गत विद्यार्थ्यांना वृक्षांचे वाटप करण्यात आले.
यावेळी नगरसेविका सोनिया कक्कड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शाळेच्या विकासासाठी संरक्षक भिंत, बोअरवेल, सोलर सिस्टिम, रंगकाम आदी विविध कामांचा प्रस्ताव मंजूर झाल्याची माहिती त्यांनी दिली. त्यामुळे शाळेच्या भौतिक सुविधांमध्ये लवकरच मोठी भर पडणार असल्याचे त्यांनी सांगितले. माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष विजय शेळके यांच्या वतीने विद्यार्थ्यांना वह्या व पेनचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमास नगरसेविका सोनिया कक्कड, भैरवनाथनगरच्या सरपंच दीपाली फरगडे, जगजितसिंग कक्कड, सेवानिवृत्त मुख्याध्यापक नवनाथ अकोलकर, प्रवीण फरगडे, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सरला खंडागळे, उपाध्यक्षा संगीता देवकर, सदस्य व अंगणवाडीसेविका इंदुमती पालवे व त्यांचे सहकारी, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष विजय शेळके तसेच सदस्य बाळासाहेब गायकवाड, बाळासाहेब लबडे, रत्नाकर कोरडे, दशरथ शिंदे, अंकुश करंडे, श्री. तुपे, तसेच मारुती शिंदे, किशोर शिंदे आदी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका स्मिता गायकवाड, ज्येष्ठ शिक्षक राजू गायकवाड, शिक्षिका प्राची लोळगे, सचिन डोखे, पल्लवी बोरुडे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक राजू गायकवाड यांनी केले. महापुरुषांच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांचा सहभाग, देशभक्तीपर कार्यक्रम आणि वृक्षवाटपामुळे शाळेचा स्वातंत्र्य दिन सोहळा विशेष ठरला.
