यावेळी विद्यार्थ्यांनी दिवाळीनिमित्त शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्वतः बनवलेले आकर्षक आकाशदिवे,रंगविलेल्या पणत्या व भेटकार्ड याचे प्रदर्शन भरविण्यात आले.वर्गासमोर विद्यार्थ्यांनी सुंदर रांगोळी काढून फुलांची सजावट केली होती.उपस्थित सर्वांनी या उपक्रमाचे कौतुक केले.दिवाळीनिमित्त दीपपूजन करून एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याचे प्रतिपादन ग्रामपंचायत सदस्या पूजा कालंगडे यांनी केले.
कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश तरस,उपाध्यक्षा सोनाली साबळे,ग्रामपंचायत सदस्या पूजा कालंगडे,महेंद्र साबळे,राधाबाई निमसे,अनिता निमसे,वनिता निमसे, अनुसया रोहोम,लक्ष्मी सोळसे,विजय खपके,आशाबाई धुळगंड आदी पालक उपस्थित होते.संतोष वाघमोडे,प्रतिभा तोरणे,मिना निकम, सुधा गमे या शिक्षकांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.शेवटी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश तरस यांनी सर्वांचे आभार मानले.या उपक्रमाचे निमगाव खैरीचे सरपंच दत्तात्रय झुराळे, उपसरपंच विजयसिंग परदेशी यांनी अभिनंदन केले.

