पालिकेत जाऊन मुख्याधिकारी मच्छिन्द्र घोलप यांना मोरगे वस्ती परिसरात राहणाऱ्या स्थानिक साडे तीनशे रहिवाशांच्या सह्यांचे निवेदन देऊन मुख्याधिकाऱ्यांशी या विषयाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. स्थानिक लोकांना कोणालाही या आठ दिवसांनी भरणाऱ्या बाजाराचा त्रास नाही. फक्त मोरगे वस्तीवरील आतील जाण्या-येण्याच्या रस्त्यावर बसणाऱ्या विक्रेत्यांना मध्यभागी बसू न देण्याची मागणी त्यांनी निवेदनात केली आहे.
मागील दहा दिवसापासून चालू असलेला बाजारातील व्यापाऱ्यांचा जागेचा प्रश्न अखेर सागर भैय्या बेग यांच्या प्रमुख मध्यस्थीने मिटल्याने स्थानिक रहिवाशी व व्यपाऱ्यांनी सागर बेग यांचे आभार मानले आहेत. कोणीतरी असंतुष्ट तक्रार करतो त्यावरून पालिका कारवाई करते, हे योग्य नसल्याचे स्थानिक रहिवाशांनी सांगितले. अनेक वर्षांपासून भरणारा हा बाजार महिलांसाठी सुरक्षित असून म्हाडा वसाहत याठिकाणी बाहेर गावाहून येणाऱ्या शेतकरी बांधवांचे व व्यपाऱ्यांचे धंदे देखील झाले नसते, असे व्यपाऱ्यांनी आपल्या व्यथा याप्रसंगी सागर बेग यांच्या समक्ष मुख्याधिकारी यांच्यासमोर मांडल्या. निवेदनातील सर्व मागण्या मान्य करून बाजार पूर्वीच्याच ठिकाणी भरेल. कोणालाही त्रास होणार नसल्याचे मुख्याधिकारी यांनी सांगितले. याप्रसंगी राजेश वाव्हाळ, सुनील पाचोणे, नितीन शिररसाठ, यांच्यासह असंख्य व्यापारी व स्थानिक रहिवाशी उपस्थित होते.