शिवसेना शिंदे गटाची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांसंदर्भात बैठक संपन्न ; जिल्हाप्रमुख बाबुशेठ टायरवाले यांची उपस्थिती


 

राहुरी : राहुरी शहर शिवसेना शिंदे गटाच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका संदर्भात जिल्हाप्रमुख बाबुशेठ टायरवाले यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक नुकतीच संपन्न झाली.
       
        राहुरी शहरातील वार्ड नंबर तीन मधील अंबिका देवी मंदिर याठिकाणी नगरपालिका निवडणूक संदर्भात शिवसेना राहुरी शहर प्रमुख गंगाधर पाटील सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवसेना जिल्हाप्रमुख बाबू शेठ यांच्या अध्यक्षतेखाली राहुरी शहर शिवसेना पदाधिकारी व नगरपालिका निवडणूक उमेदवारी साठी इच्छुक उमेदवार तसेच असंख्य शिवसैनिक व महिला यांची बैठक संपन्न झाली.
                    याप्रसंगी बाबुशेठ टायरवाले यांनी प्रत्येक इच्छुक उमेदवाराची संपूर्ण माहिती घेऊन व परिचय घेऊन त्यांना निवडणूक संदर्भात योग्य मार्गदर्शन केले तसेच पूर्णपणे ताकतीने लढण्यासाठी आम्ही  तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत तसेच योग्य ते सहकार्य मार्गदर्शन आमचे राहील असे आवर्जून सांगितले.

                     महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील उप मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख एकनाथजी शिंदे यांच्या मुख्यमंत्री काळातील जनहिताच्या कामाची पावती हाच आपला विजय समजून आपण कामाला लागावे हे बाबुशेठ यांनी त्यांच्या भाषणात आवर्जून सांगितले.

त्याचबरोबर शहरातील शिवसेना पदाधिकाऱ्यांना सुचित केले की तुम्ही सर्वांनी प्रत्येक वार्डातील इच्छुक उमेदवाराला बरोबर घेऊन नागरिकांच्या गाठीभेटी घेऊन त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहावे. नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आम्ही तुमच्या बरोबर आहोत असेही आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

                     बैठक प्रसंगी शहर प्रमुख गंगाधर सांगळे यांनी इच्छुक उमेदवारांना योग्य मार्गदर्शन करून आपण तुमच्या बरोबर पूर्ण ताकदीनिशी उभे राहण्याचे आवर्जून सांगितले तसेच इच्छुक उमेदवारांनी कुणाच्याही दडपणाला बळी न पडता नागरिकांची संपर्क वाढवून त्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत असे सांगितले.शिवसैनिक विक्रम गाडे यांनीही निवडणुकी संदर्भात इच्छुक उमेदवारांना योग्य मार्गदर्शन केले.

                     शिवसेना कार्यकर्ते गणेश सोनार हे म्हणाले की, ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला म्हणजेच निवडणुकीला पन्नास दिवस शिल्लक आहेत शिवसैनिकांनी पदाधिकारी यांना बरोबर घेऊन इच्छुक उमेदवारांच्या प्रत्येक वार्डामधील नागरिकांच्या गाठीभेटी घेऊन त्यांना एकनाथजी शिंदे यांच्या कार्याची संपूर्णपणे माहिती देऊन त्याच पद्धतीने आम्ही सुद्धा राहुरी शहरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मार्गदर्शनाखाली काम करणारे शिवसैनिक आहोत.आपण प्रत्येक मतदारांच्या घरापर्यंत पोहोचवलं पाहिजे. त्यामुळे शिवसेनेच्या उमेदवारांचा विजय निश्चित असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.  बैठकीस असंख्य शिवसैनिक पदाधिकारी व महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. गंगाधर सांगळे, बाळासाहेब पवार, गोरक्षनाथ सिन्नरकर, विकास काशीद, भानुदास जाधव सर, विशाल मकासरे, एकनाथ जगधने, काकासाहेब आडागळे,कांताराम वराळे,डॉ. रमेश शिंदे, विलास भुजाडी, विक्रम गाडे,भारत भवर,कैलास तनपुरे, विजय ढगे,सुरेश देठे, नामदेव पवार,अरुण साळवे,बाबासाहेब विरूळे,विलास तनपुरे,पै.संजय खपके,अशोक साळुंखे, ज्येष्ठ शिवसैनिक काळे सर,विलास जगधने,सुरेश आजबे, सुरेश देवरे,नवनाथ भुजाडी,विकास साळवे, राजेश भागवत,वैभव भागवत,सुनील तनपुरे,रवींद्र डावखर, गणेश सोनार,योगेश घाडगे,विजय शिंदे, गोरक्षनाथ मेहत्रे, पांडुरंग पठारे, अशितोष शिंदे, विलास साळवे,पोपट शिंदे,किशोर तनपुरे, दुर्गेश वाघ,प्रकाश गावडे,ओंकार डाग वाले,ऋषी ताकते, सुधाकर वाघ,मधुकर वाघ,बाबासाहेब रोकडे,बाळासाहेब येवले,सुनील वाघ, दिलीप गावडे,अशोक गावडे,सिताराम येवले, हरिभाऊ आपसे, भानुदास झावरे,विजय झावरे, संतोष गाडे,जालिंदर पाटोळे,ढोकणे मेजर, महिला आघाडी मालतीताई डफळ, इंदुताई दिवे,बबनबाई वाघ,ताराबाई माने, शैलाताई पवार, रुक्मिणीबाई जाधव, लक्ष्मीबाई आरगडे, मीराबाई रसाळ आदी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेच्या विचारांना मानणारे शिवसैनिक मोठ्या संख्येने यावेळी बैठकीस उपस्थित होते. बैठकीनंतर जिल्हाप्रमुख बाबुशेठ यांच्या शिवसैनिक पदाधिकारी व महिला आघाडी यांच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post