श्रीरामपूर : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर तालुक्याचे राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. पोरापासून नातवापर्यंत चालू असलेल्या घराणेशाहीला या निवडणुकीत सुरुंग लागला आहे. हिंदुत्वासाठी धर्मरक्षक सागर बेग हा एक उत्तम पर्याय जनतेसमोर आल्याने प्रस्थापितांच्या बुडाखालची वाळू सरकायला लागली आहे, तर आपलं बुड आणि वाळू दोन्ही शाबूत ठेवण्यासाठी त्यांनी आपापल्या परीने प्रयत्न चालवले असले तरी त्यांचा पालिका निवडणुकीत टांगा पलटी करायचा चंग हिंदुत्ववादी युवकांनी बांधलेला असल्याचा बघावयास मिळत आहे.
आजपर्यंत सर्वधर्मसमभाव काटेकोरपणे पाळून प्रभू श्रीरामांना काल्पनिक म्हणणाऱ्या आणि न चुकता शीरखुर्माच्या ईफ्तार पार्ट्या कार्यकर्त्यांना देणाऱ्या काँग्रेस पक्षाने हिंदूंच्या मतांवर सत्ता भोगलेली आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या अनपेक्षीत निकालानंतर हेच प्रस्थापित हिंदूंच्या मतांसाठी हिंदुत्ववादी विचारांच्या पक्षांबरोबर जात आहेत. राजकारणातील निम्म्याच्या वर आयुष्य हिंदू विरोधी पक्षा बरोबर घालवलेल्या या पुढारी,कार्यकर्त्यांची हिंदुत्ववादी विचारांच्या पक्षातील घुसखोरी पाहून अनेक हिंदूंना आश्चर्याचा धक्काच बसलेला आहे. पण, या घुसखोरांना पालिका निवडणुकीत चांगलाच इंगा दाखवण्याचा पक्का ईरादा मतदारांनी केल्याचे चर्चेतून समोर आले आहे.
सागर बेग यांच्या रूपाने तालुक्याला एक चांगले उमदे कट्टर हिंदुत्ववादी नेतृत्व लाभल्याने प्रस्थापितांच्या बुडाला मात्र त्यामुळे आग लागली आहे.सागर बेग यांचे वाढते प्रस्थ आणि वर्चस्व थोपवण्यासाठी काही कुटील डाव विरोधकांमध्ये सिजत असून त्याअगोदरच त्यांचे कारनामे बाहेर निघतील अशा चर्चा सध्या शहरात सुरु आहे.
येऊ घातलेल्या पालिका निवडणुकीत सागर बेग यांचा करिष्मा पुन्हा बघायला मिळणार असून एका गरीब कुटुंबातील हिंदुत्वाची मशाल घेऊन हिंदुत्व जागवणारा सागर बेग विरुद्ध प्रभू श्रीराम काल्पनिक आहे म्हणणाऱ्या पक्षाला सर्वस्व समजणाऱ्या प्रस्थापितांच्या विरोधात ही लढाई होणार असून त्याकडे जिल्ह्याबरोबरच संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहणार आहे.