श्रीरामपूर सबरजिस्ट्रार कार्यालयात दस्तमाफियांचा राबता ; दुय्यम निबंधकांच्या आशीर्वादाने पक्षकारांची आर्थिक लूट : पुणे मुख्यालयात तक्रार

 


श्रीरामपूर : श्रीरामपुरातील सबरजिस्ट्रार कार्यालयात दुय्यम निबंधकांच्या आशिर्वादाने कायदेशीर पद्धतीने दस्त नोंदवण्यासाठी नागरिकांकडून निर्धारित मुद्रांक शुल्काव्यतिरिक दस्तमाफियांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात लाच घेतली जाते.   दुय्यम निबंधकांच्या पाठबळामुळेच दलाल व भूमफियांचा याठिकाणी नेहमी राबता असतो. दुय्यम निबंधकांनी पाळलेले एजंट संगनमताने पक्षकारांची अडवणूक करून आर्थिक लूट करतात. या कार्यालयातील सर्व अनियमिततेची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी तक्रार सामाजिक कार्यकर्ते राजेश बोरुडे, राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे तालुकाध्यक्ष शिवाजी दांडगे, आरटीआय कार्यकर्ते सुधीर तुपे यांनी पुणे मुख्यालयातील नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, अहिल्यानगर येथील सह जिल्हा निबंधक यांच्याकडे केली आहे. दोषींवर कारवाई न झाल्यास आंदोलन छेडण्याचा सज्जड इशारा देण्यात आला आहे.

यासंदर्भात दिलेल्या तक्रारीत म्हंटले आहे कि, दुय्यम निबंधक कार्यालयातील अधिकारी, दलाल, भूमाफिया यांच्या संगनमताने मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार सुरु आहे. यामुळे सामान्य नागरिकांना प्रचंड त्रास होत असून, शासनाचा महसूल बुडत आहे. कोणताही दस्त कायदेशीर पद्धतीने नोंदवण्यासाठी नागरिकांकडून निर्धारित मुद्रांक शुल्काव्यतिरिक्त मोठी लाच घेतली जाते. ही लाच दलालांच्या माध्यमातून स्वीकारली जाते, जे दुय्यम निबंधकांच्या आशीर्वादाने कार्यालयात बिनधास्त वावरतात, असा आरोपही राजेश बोरुडे, शिवाजी दांडगे, सुधीर तुपे यांनी केला आहे. नियमानुसार आवश्यक असलेली कागदपत्रे असतानाही, अनेक दस्तांची नोंदणी हेतुपूरस्पर नाकारली जाते. यासाठी अनावश्यक त्रुटी दाखवल्या जातात. नंतर, याच दस्तांची नोंदणी दलालांना पैसे दिल्यावर नियमबाह्य पद्धतीने केली जाते. यामुळे नागरिकांना आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचे तक्रारीत म्हंटले आहे.


बोगस दस्तनोंदणी...
या कार्यालयात बनावट कागदपत्रे वापरून अनेक बोगस दस्तनोंदणी झाल्याचा संशय आहे. यामुळे शासनाची फसवणूक होत असून, जमिनीच्या मूळ मालकांचे हक्क धोक्यात आले आहेत.

नियमबाह्य संपत्ती...

दुय्यम निबंधक आणि त्यांच्याशी संबंधित दलाल यांनी या गैरव्यवहारातून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर संपत्ती जमा केली आहे. याची सखोल चौकशी करावी.

मागण्या...

१) दुय्यम निबंधक, श्रीरामपूर आणि संबंधित दलालांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत तात्काळ गुन्हा दाखल करुन सखोल चौकशी करावी.

२) गेल्या तीन वर्षांत दुय्यम निबंधक, श्रीरामपूर कार्यालयात झालेल्या सर्व दस्तनोंदणीची विशेष तपासणी पथकाकडून तपासणी करावी आणि बोगस आढळलेल्या नोंदी रद्द कराव्यात.

3) दुय्यम निबंधक व दलालांनी मिळवलेल्या बेकायदेशीर संपत्तीची चौकशी करून ती जप्त करण्याची कारवाई करावी.

4. दुय्यम निबंधक कार्यालयात पारदर्शकता आणण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवून त्यांचे थेट फुटेज कार्यालयात दर्शनी भागात प्रदर्शित करावे.


Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post