धर्मरक्षक सागर बेग यांच्या धर्मकार्याचा श्रीस्वामी नरेंद्रचार्यजी महाराजांकडून गुणगौरव



श्रीरामपूर : धर्मांतर, लवजिहाद, लँडजिहाद,गोहत्या विरोधात धर्मरक्षक सागर बेग यांचे महाराष्ट्रभर अविरत चालू असलेले कार्य अनन्यसाधारण अलौकिक असे धर्मकार्य असून, बेग यांच्या धर्मकार्याचा गुणगौरव करत नाणीजधामचे जगद्गुरू रामानंदचार्य श्रीस्वामी नरेंद्रचार्यजी महाराज यांनी सागर बेग यांना शुभ आशीर्वाद दिले आहेत.

नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी या पावनभूमीत समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळा कार्यक्रम संपन्न झाला. त्या कार्यक्रमास उपस्थित राहून सागर बेग यांनी जगद्गुरू नरेंद्रजी महाराज यांचे शुभाशीर्वाद घेतले. आतापर्यन्त हिंदू धर्म सोडून इतर धर्मात गेलेल्या संपूर्ण भारतातील 1 लाख 51 हजार हिंदूना पुन्हा हिंदू धर्मात विधीवत प्रवेश नरेंद्रजी महाराजांनी केलेले आहेत. नरेंद्रजी महाराजांशी सागर बेग यांनी धर्मकार्यावर सविस्तर चर्चा केली. लाखो भक्तांच्या उपस्थित होणाऱ्या या दर्शन सोहळा कार्यक्रमातून वेळ काढून जगद्गुरू नरेंद्रजी महाराजांनी सागर बेग यांच्या धर्मकार्याची संपूर्ण माहिती घेतली. सागर बेग यांचे चालू असलेले धर्मकार्य अखंड अविरत चालू राहावे म्हणून जगद्गुरू नरेंद्रजी महाराजांनी सागर बेग यांना यावेळी आशीर्वाद दिले.

याप्रसंगी राष्ट्रीय श्रीराम संघांचे राहता तालुकाध्यक्ष मदन आप्पा मोकाटे,तुषार थेटे,यांच्यासह असंख्य हिंदू धर्मरक्षक व राष्ट्रीय श्रीराम संघांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपास्थित होते.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post