श्रीरामपूर | टिळकनगर इंडस्ट्रीज प्रकरणावरून आमदार हेमंत ओगले यांनी घेतलेल्या कठोर भूमिकेचा निषेध करत असून, प्रदूषणग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, होणारे प्रदूषण कसे कमी करता येईल, शेतकऱ्यांच्या मुलांना कसा रोजगार देता येईल, त्यासाठी कारखाना प्रशासनाबरोबर बैठक घेऊन दोनही घटकांना न्याय मिळेल. याबाबत लवकरच चर्चा करण्यात येणार असल्याचे आश्वासन राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर बेग यांनी दिले आहे.
टिळकनगर इंडस्ट्रीज प्रकरणावरून आ.हेमंत ओगले यांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल परिसरात अनेक संघटनांकडून तीव्र आंदोलन सुरू आहे. टिळकनगर इंडस्ट्रीज मुळे अनेक कामगारांचे कुटुंब व्यवस्था अवलंबून असून आधारित उद्योगांवर अनेक लोकांचे संसार सुरू आहेत. आ.हेमंत ओगले यांनी विधानसभेत कारखाना बंद करण्याची केलेली मागणी ही अतिशय चुकीची असून त्याचा निषेधच आहे त्यामुळे अनेकांचे प्रपंच धुलीस मिळतील नागरिकांवर उपासमारीची वेळ येईल. टिळक नगर इंडस्ट्रीज ही परिसराची कामधेनू आहे.मागील 30-35 वर्षापासून परिसरातील अनेकांना येथे रोजगार उपलब्ध झालेला आहे आणि कामगारांची रोजी रोटी कारखान्यामुळे सुरू आहे. कारखाना बंद करण्याची भूमिका घेतल्यास बेरोजगारीची समस्या निर्माण होणार आहे.
कारखान्याच्या प्रदूषित पाण्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे, हे खरे आहे. त्या विरोधात शेतकरी वेगवेगळ्या स्तरावर आंदोलने करून न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. शेतकऱ्यांचे अर्थकारण बिघडले आहे एका बाजूला कारखाना सुरू राहिला पाहिजे. नोकऱ्या रोजगार टिकले पाहिजे. दुसऱ्या बाजूला प्रदूषणग्रस्त शेतकऱ्यांना देखील न्याय मिळाला पाहिजे होणारे प्रदूषण कसे कमी करता येईल. शेतकऱ्यांच्या मुलांना कसा रोजगार देता येईल. त्यासाठी कारखाना प्रशासनाबरोबर लवकरच बैठक घेऊन दोन्हीही घटकांना न्याय मिळेल, याबाबत सविस्तर चर्चा करण्यात येणार असल्याचे श्री सागर बेग यांनी सांगितले आहे.