जुने नायगाव शाळेत प्रवेशोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न; पहिल्याच दिवशी दाखलपात्र १००% टक्के विद्यार्थी शाळेत दाखल

श्रीरामपूर : तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा नायगाव जुने शाळेत शाळेच्या पहिल्या दिवशी शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रभात फेरी काढण्यात आली.शाळेत पताका व फुग्यांची सजावट करण्यात आली.इयत्ता पहिलीत दाखलपात्र विद्यार्थ्यांवर पुष्पवर्षाव करून त्यांचे स्वागत करण्यात आले.

नवागतांचे औक्षण करून पहिले पाऊल अंतर्गत विद्यार्थ्यांच्या पायांचे ठसे घेण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नायगावच्या माजी उपसरपंच मिनाताई लांडे होत्या. सुरुवातीला शाळेचे मुख्याध्यापक संतोष वाघमोडे व शिक्षिका सुजाता सोळसे यांनी शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमाचे महत्व स्पष्ट केले.यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक वाटप,मोफत गणवेश वाटप,मोफत बूट व सॉक्सचे वाटप करण्यात आले.सर्व विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजन देण्यात आले.पालक व ग्रामस्थांच्या सहकार्याने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना थ्री इन वन ची प्रत्येकी एक वही व शिस्पेन्सिलचे वाटप करण्यात आले.

यावेळी पालक किरण दातीर यांनी शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमाच्या नियोजनाबद्दल व शाळा परिसरातील सर्व दाखलपात्र विद्यार्थ्यांनी झेड पी च्या शाळेत प्रवेश घेतल्याबद्दल शिक्षकांचे अभिनंदन करून सर्व विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमास सरपंच डॉ.राजाराम राशिनकर,ग्रामसेवक प्रेमचंद वाघमारे,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष निलेश लांडे,उपाध्यक्ष अशोक वाघ,माजी अध्यक्ष संतोष राशिनकर,ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण पवार,शिक्षणप्रेमी ग्रामस्थ सुनिल दातीर, बाळासाहेब बोर्डे,सागर लहारे,किरण दातीर,राजू गायकवाड,अंगणवाडी सेविका हिराबाई त्रिभुवन,इंदुबाई लांडे, मंगल लांडे,सरला राशिनकर आदी पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.शेवटी सुनिल दातीर यांनी सर्वांचे आभार मानले.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post