अहिल्यानगर | मतांसाठी जिहाद्यांपुढे लोटांगण घालणाऱ्या पुढाऱ्यांवर बहिष्कार टाका ; राष्ट्रीय श्रीराम संघांचे अध्यक्ष सागर बेग यांचे आवाहन


अहिल्यानगर : मुसलमानांच्या विरोधात बोलणाऱ्या आमदार संग्रामभैय्या जगताप यांचेवर कारवाई करा, म्हणून अजित दादा पवारांकडे काही मुल्ले गेले. पण, याच मुसलमानांनी खुद्द दादांनाच मतदान केलेले नाही, हे दादा विसरलेले नाहीत. संग्रामभैय्यांना अजित दादांनी भेटीस बोलावले. हे व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत आहेत तसं काही नसून ती छत्रपतींची नीती असून सकल हिंदू समाज संग्राम भैय्यांच्या मागे असल्याचे स्पष्ट आणि परखड मत राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर बेग यांनी मांडले आहेत.

                राष्ट्रवादी पक्षाचे कट्टर हिंदुत्ववादी आमदार संग्रामभैय्या जगताप हे मुसलमानांच्या विरोधात प्रक्षोभक भाषणे करतात म्हणून काही मुस्लिम मुल्ल्यांनी खुद्द राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा अजितदादा पवार यांच्याकडे मुंबई येथे जाऊन आमदार संग्राम जगताप यांचेवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तर राज्यात काही ठिकाणी आमदार जगताप यांच्या विरोधात काही विधर्मी मुस्लिम संघटना आंदोलन करत आहेत. आमदार संग्राम जगताप यांच्या मागे महाराष्ट्रातील सकल हिंदू समाज आहे, हे दाखवण्यासाठी अहिल्यानगर शहरात आमदार संग्राम जगताप यांच्या हिंदुत्ववादी प्रखर विचारांच्या समर्थनार्थ भव्य मोर्चा व सभेचे आयोजन केले होते, त्याप्रसंगी सागर बेग हे बोलत होते.

            आपल्या घणाघाती भाषणात त्यांनी मतांसाठी मुसलमानांची हुजरेगिरी करणाऱ्या जिल्ह्यातील काही नेत्यांची चांगलीच ठोकून काढली. छत्रपतींचे हिंदुत्वाचे स्वप्न आज आपण पूर्ण करू शकत नसू तर महाराष्ट्रातील हिंदू षंढ झालेला आहे असेच म्हणावे लागेल, असे म्हणून मतांसाठी विधर्मी जिहाद्यांपुढे लोटांगण घालणाऱ्या पुढाऱ्यांना कोणत्याही कार्यक्रमात न बोलवता त्यांच्यावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन सागर बेग यांनी यावेळी केले. वक्फ बोर्ड संशोधन विधेयक संसदेत मांडण्यात आले, तेव्हा खासदारांचे मत घेण्यात आले. त्यावेळी आपल्या जिल्ह्यातील दोन खासदारांनी मुस्लिम खासदारांसह वक्फ बोर्डाचे समर्थन करत मतदान केलं, हे अत्यंत चुकीचे असून अशा लोकनेत्यांना गावबंदी केली पाहिजे. असे सांगून बेग पुढे म्हणाले की, हिंदुत्वाची बाजू परखडपणे मांडणाऱ्या आमदार संग्राम भैय्यांच्या विरोधात मागे बोलणाऱ्यांना यापुढे दांड्याचीच भाषा समजणार आहे आणि दांडे त्यांच्या अशा ठिकाणी घाला की पुन्हा त्यांचा आवाजच निघणार नाही.
मोदी सरकारने काश्मीरमधील हिंदू विरोधी व मुस्लिम धार्जिणा ३७० कलम रद्द केले, म्हणून आज आपण मोदींच्या मागे खंबीरपणे उभे आहोत. वाल्मिकी समाजातील कितीही उच्चशिक्षित व्यक्ती असला तरी त्याला साफ सफाईचेच काम करत होते. हा अन्याय मोदींमुळे बंद झाला असून काश्मीरमधील वाल्मिकी समाजाला हिंदू म्हणून अभिमानाने जगण्याचा अधिकारच ३७० कलम हटवल्यावर मिळाल्याचा उल्लेख सागर बेग यांनी खासकरून आपल्या भाषणातून केला. आजपर्यंत १६० मोर्चे लवजिहाद व धर्मांतर विरोधात काढले. परंतु, महाराष्ट्र शासनाने त्यावर कडक कायदे केलेले नसल्याची खंत व्यक्त करत बेग यांनी इतर राज्यात मोर्चे न काढताही याबाबत कायदे कडक केल्याचा सांगून लावजिहाद,धर्मांतर बंदी कायदा व गोहत्या बंदी कायदा कडक करण्याची मागणी यावेळी केली.

                माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी आपल्या भाषणातून मुसलमानांचे नाव घेण्याचे टाळत जे लोकं संग्राम भैय्यांच्या विरोधात एक झालेत त्यांच्या विरोधात हिंदू एकवटल्याचे सांगत या प्रवाहात यायला मला वेळ लागेल पण हळूहळू त्या मार्गाने येत आहे. पण संग्राम भैय्या जगताप मला मागे टाकून पुढे गेलेत त्यांना मागून धक्का देण्यासाठी आज मी येथे उभा आहे असे सांगून त्यांनी संग्राम जगताप यांना पाठिंबा दर्शवला. याप्रसंगी समाज प्रबोधनकार कीर्तनकार संग्राम बापू भंडारे,अशोकनाथजी महाराज,यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post