बेलापूर : बेलापूर येथील लोकशाही सेनानी कै. गंगाधरशास्त्री बद्रीनारायणशेठ साळुंके यांच्या ९६ व्या जयंतीनिमित्त 'आणीबाणी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ' यावर नुकतेच व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
हे व्याख्यान आणीबाणी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या विषयावर जेष्ठ शिव व्याख्याते, महानाट्य जाणता राजा याचे प्रथम दिग्दर्शक, प. पु. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे निकटवर्तीय, जेष्ठ संघ स्वयंसेवक श्री. दिवाकरजी पांडे यांचे अत्यंत श्रवणीय व्याख्यान प्रत्यक्षात व ऑनलाइन द्वारे (आभासी माध्यमातून) सर्व श्रोत्यांसाठी कुमार सुरभी सोसायटी स्वारगेट पुणे येथे उपलब्ध करण्यात आले. तसेच सदरच्या कार्यक्रमास मा. अध्यक्ष महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिल, गुरूवर्य Adv.(Dr.) श्री. सुधाकरराव आव्हाड सर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पर्वती भागाचे संघचालक Adv.श्री. चंद्रशेखरजी कुलकर्णी हे प्रत्यक्षात आवर्जून प्रमुख पाहुणे म्हणून हजर होते.
तसेच सदर कार्यक्रमाच्या वेळी आणीबाणी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या अभेद्य नात्यावरती शिव व्याख्याते मा. श्री. दिवाकरजी पांडे यांच्या बरोबरच अनेक मान्यवरांचे तसेच जुन्या संघ स्वयंसेवकांचे विचार मांडण्यात आले. सदरच्या कार्यक्रमास गुरुवर्य Adv. Dr. श्री. सुधाकरराव आव्हाड सर यांचेही आणीबाणी काळात भारतीय न्यायालयातील परिस्थिती याबद्दल वास्तविकता दाखवणारे उद्बोधन श्रोत्यांसाठी खूप मोलाची आणि न माहीत असलेली अमूल्य माहिती देऊन गेली.
सदरच्या कार्यक्रमासाठी बेलापूर येथून अनेक नागरिक प्रत्यक्षात उपस्थित होते यामध्ये बेलापूर भूषण Adv. श्री. सखाराम दादा कोळसे पाटील, श्री. राजेंद्रजी श्रीगोड, Adv. श्री. बाळासाहेब खंडागळे व इतर अनेक स्थानिक संघ स्वयंसेवक, नागरिक देखील प्रामुख्याने प्रत्यक्षात उपस्थित होते.
सदरचा कार्यक्रम हा अनेक श्रोत्यांनी, विद्यार्थ्यांनी, बेलापूर-श्रीरामपूर तसेच पंचक्रोशीतील अनेक संघ स्वयंसेवकांनी ऑनलाइन पद्धतीने ही जॉईन करून अनुभवला. सदरच्या कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडल्याबद्दल सर्व प्रत्यक्ष उपस्थित आणि ऑनलाईन उपस्थितांचे गंगाधरशास्त्री बद्रीनारायणशेठ साळुंके सामाजिक प्रतिष्ठान बेलापूर यांचे वतीने Adv. श्री. मयूर पुरुषोत्तम साळुंके, Adv.Er. श्री. अजिंक्य पुरुषोत्तम साळुंके, प्रज्वल प्रताप साळुंके, सोहम प्रताप साळुंके, संजय प्रदीप साळुंके व प्रतिष्ठानच्या इतर सर्व सदस्यांनी मान्यवर व श्रोत्यांचे मनापासून आभार मानले.
Tags
महाराष्ट्र