श्रीरामपूर : सध्या संपूर्ण राज्यामध्ये विधान परिषद निवडणूक संदर्भात जोरदार हालचाली सुरू झाल्या असून, अखिल भारतीय धनगर समाज विकास परिषदेचे प्रदेशाध्यक्ष व भाजपाचे उत्तर नगरचे जिल्हा सचिव श्री दत्तात्रय खेमनर यांना विधान परिषदेवर संधी मिळावी म्हणून राज्यातील धनगर समाजाचे कार्यकर्ते भाजप पक्षाकडे मागणी करत आहे.
श्री दत्तात्रय खेमनर यांनी राज्यामध्ये धनगर समाजाचे मोठे संघटन करून लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप महायुतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी उमेदवारांना पाठिंबा देऊन अनेक प्रचार सभा घेतल्या होत्या. नगर जिल्ह्यातील देखील. महायुतीचे उमेदवार निवडून आणण्यामध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे अनेक ठिकाणी प्रचारसभा देखील घेतल्या त्यांनी घेतलेल्या सभेमुळे जिल्ह्यातील उमेदवारांना फायदा झाला दत्तात्रय खेमनर हे गेले पंधरा वर्ष भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते आहे त्यांनी या अगोदर आठ वर्ष भाजपा मध्ये भटके विमुक्तांसाठी काम केलेले आहे. सध्या ते भाजप पक्षामध्ये उत्तर नगरच्या जिल्हा सचिव पदावर कार्यरत आहे. आक्रमक हिंदुत्वादी म्हणून देखील त्यांची एक मोठी ओळख आहे. धनगर समाजाला नेहमी भाजपा महायुती सोबत ठेवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले.
दत्तात्रय खेमनर यांच्या विधानसभेतील आक्रमक व प्रभावशाली भाषणांमुळे धनगर समाजामध्ये जागृती होऊन समाजाने महायुतीला मोठे मतदान टाकले. त्यामुळे धनगर समाजाचे नेते आमदार गोपीचंद पडळकर हे जत विधानसभा निवडणुकी मधून. विजय झाल्यामुळे त्यांची विधान परिषदेची जागा रिक्त झाली आहे. आणि ही जागा पुन्हा. धनगर समाजाचे नेते भाजपामधील निष्ठावंत कार्यकर्ते दत्तात्रय खेमनर यांना देण्यात यावा अशी मागणी राज्यातील धनगर समाजाकडून भाजप महायुतीकडे जोर धरत आहे. खेमनर यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळाल्यास महाराष्ट्रातील धनगर समाजाला पुन्हा एकदा न्याय मिळण्याची शक्यता आहे. आणि अहिल्या नगरला देखील एक विधान परिषदेचा आमदार मिळणार आहे. दत्तात्रय खेमनर यांना उमेदवारी मिळावा म्हणून भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांकडे देखील मागणी करण्यात येत आहे. त्यांना उमेदवारी मिळावा म्हणून भाजपाच्या केंद्रीय नेत्यांकडे देखील त्यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. भाजप पक्षाकडून खेमनर यांच्या नावाचा विचार होऊ शकतो. दत्तात्रय खेमनर यांना विधान परिषदेवर घेतल्यास आगामी नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत. समिती निवडणूक मध्ये भाजप महायुतीला नक्कीच फायदा होईल.