श्रीरामपूर एज्युकेशन सोसायटी हायस्कूलचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक सोपान सानप यांचे निधन


श्रीरामपूर
: येथील श्रीरामपूर एज्युकेशन सोसायटी हायस्कूलचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक व लोकमान्य मंडळाचे जेष्ठ सदस्य सोपान एकनाथ सानप (वय ८०) यांचे शनिवार, दि. ८ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजता हृदयविकाराने निधन झाले.

त्यांच्या पश्‍चात १ भाऊ, २ मुले, २ मुली, पुतणे, जावई व नातवंडे असा परिवार आहे. ते प्रगतशील शेतकरी नितीन व सचिन सानप यांचे वडील, चंद्रकांत सानप यांचे धाकटे बंधु व डोंबिवली येथील उद्योजक संजय सानप यांचे ते चुलते होते.

स्व. सोपान सानप यांचा शिक्षण क्षेत्रात लौकीक होता. कर्तव्यदक्ष व विद्यार्थ्यांवर सुसंस्काराबरोबरच ज्ञानाजर्नाचे काम त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे केले. लोकमान्य मंडळाचे ते जेष्ठ सदस्य व पदाधिकारी होते. शिक्षण क्षेत्रात सानपसर म्हणून त्यांचा लौकीक होता.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post