अहिल्यानगर जिल्ह्यात रविवारी शिष्यवृत्ती परीक्षा; ५६ हजार विद्यार्थी प्रविष्ट, ३९४ परीक्षा केंद्र


अहिल्यानगर : पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.5 वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृनी परीक्षा (इ.8 वी) दि.09/02/2025 रोजी अहिल्यानगर जिल्हयातील इ.5 वी च्या 233 व इ.8 वी च्या 161 अशा एकूण 394 परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणार आहे.

या परीक्षेसाठी 2 पेपर आहेत. सकाळी 11.00 ने 12.30 या वेळेत पेपर क्र. 1 भाषा व गणित तसेच दुपारी 2.00 ते 3.30 या वेळेन पेपर क्र.2 गणित व वुध्दीमत्ता चाचणीचा आहे. 

विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या वेळेपूर्वी अर्धातास आधी परीक्षागृहात प्रवेश दिला जाणार आहे. मुख्याध्यापक यांच्या लॉग-इनला सर्व विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र उपलब्ध असून मुख्याध्यापकांना प्रवेशपत्राच्या प्रती विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन देण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत.

परीक्षेसाठी सर्व व्यवस्थापनाच्या शाळेचे इ.5 वी चे 34569 व इ.8 वी चे 22061 असे एकूण 56630 विद्यार्थी प्रविष्ठ झालेले आहेत.

सदर परीक्षेसाठी परीक्षा केंद्रावर इ.5 वी साठी 2432 व इ.8 वी साठी 1574 अशा एकूण 4006 कर्मचान्यांची नेमणूक केलेली आहे.

परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी दि.05/02/2025 रोजी जिल्हास्तरावरुन सर्व गटशिक्षणाधिकारी, परीक्षेचे कामकाज पाहणारे अधिकारी, केंद्रसंचालक यांची सभा घेऊन सविस्तर सूचना देण्यात आल्या. जिल्हा व तालुकास्तरावरुन सदर परीक्षा केंद्रांना भेटी देण्याचे नियोजन केलेले आहे.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post