शिष्यवृत्ती परिक्षेत ईश्वरी फोपसे जिल्ह्यात २४ वी तर विद्यालयात दुसरी


श्रीरामपूर
: तालुक्यातील गोंडेगाव येथील पीएमश्री जिल्हा परिषद प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळेची विद्यार्थिनी ईश्वरी फोपसे हिने पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परिक्षेमध्ये जिल्हा गुणवत्ता यादीत २४ वा क्रमांक तर विद्यालयात २ रा क्रमांक पटकविला आहे.

ईश्वरी ही गोंडेगावच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत आठवीच्या वर्गात शिकते. महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद पुणे यांच्यावतीने ही परिक्षा घेण्यात आली होती. तिचा निकाल आता जाहीर करण्यात आला. राष्ट्रीयक्त बँकांचे कर्ज सल्लागार सचिन फोपसे व ईश्वरी फॅशन्सच्या संचालिका वर्षा फोपसे यांची ईश्वरी ही कन्या आहे.

तिच्या यशाबद्दल सर्वच स्तरातून तिचे कौतूक होत आहे. तिला विद्यालयाचे मुख्याध्यापक संपत हिरगळ, वर्ग शिक्षक मिना निकम-जेजूरकर, भाऊसाहेब पटेकर, मिरा चव्हान, संगिता गायकवाड, ज्योती बडूसल, शाहिना शेख, अंजूम तांबोळी, गणेश महाडिक, सुभाष तुपे, विक्रम कहांडळ, सविता सांळुंके, राजेंद्र पंडित, दिपक शेळके, गौतम गायकवाड आदी शिक्षिका-शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले आहे. विद्यालयाच्यावतीने नुतकचात ईश्वरीचा छोटेखानी सत्कार करण्यात आला. 

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post