कोपरगाव (गौरव डेंगळे) : दि ६ ते ८ जानेवारी २०२५ दरम्यान न्यू इंग्लिश स्कूल,संवत्सर येथे ५२ वे कोपरगाव तालुकास्तरीय विज्ञान, गणित व पर्यावरण प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या तालुक्यास्तरीय गणित-विज्ञान प्रदर्शनामध्ये कोपरगाव तालुक्यातून ३०० ते ३५० शाळांनी सहभाग नोंदवला होता. गणित व विज्ञान मिळून सुमारे ६०० च्या वर प्रयोग प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांने तयार केले होते. या प्रदर्शनामध्ये सोमैया विद्या विहार संचलित श्री शारदा इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थिनी कु निकम स्वरा रवींद्र हिने गणित विषयात लहान गटात दुसरा क्रमांक पटकावला तर विज्ञान विषयात मोठ्या गटात (इयत्ता नववी ते बारावी) शेटे अनुराग संतोष याने तृतीय क्रमांक पटकावला.
या यशाबद्दल शाळेचे प्राचार्य श्री के एल वाकचौरे, उपप्राचार्या शुभांगी अमृतकर,पर्यवेक्षिका सौ प्रज्ञा पहाडे,सौ पल्लवी ससाणे, सौ नैथलीन फर्नांडिस व सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.
यशस्वी विद्यार्थ्यांना गणित विषयाचे शिक्षक अर्चना गायकवाड,रुपाली चांदोरे,रणजित खळे, सुनंदा कदम,प्रसाद भास्कर,वैशाली शिंदे,शितल मलिक,झेबा शेख तसेच विज्ञान विषयाचे नारायण गाडेकर, स्वरूपा वडांगळे,वंदना जगझाप,पल्लवी ससाणे,माधुरी भस्मे,सायली डोखे आदींचे मार्गदर्शन लाभले.