खंडाळा (गौरव डेंगळे) : अहिल्यानगर येथील रेसिडेन्शिअल हायस्कूल येथे जिल्हा परिषद अहिल्यानगर यांच्यावतीने जिल्हास्तरीय विविध गुणदर्शन व सांस्कृतिक स्पर्धा आयोजन करण्यात आले होते. १४ तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकाविलेल्या १४ शाळांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला होता. खंडाळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने समूह गीत गायन स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला व श्रीरामपूर तालुक्यातून एकमेव शाळेने बक्षीस पटकावण्याचा मान मिळवला.
यशस्वी विद्यार्थ्यांना रवींद्र पाटोळे, सुनील सिनारे, सुनील खरात, सुनील बिराडे तसेच शिक्षक वृंदांचे मार्गदर्शन लाभले.स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे प्रवासाचे सहकार्य राधाकिसन बोरकर यांनी केले.तृतीय क्रमांक पटकावल्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक रमेश शिंदे,शाळा व्यवस्थापन समिती,ग्रामपंचायत खंडाळा, तंटामुक्ती समिती तसेच सर्व पालक वृंदांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.