श्रीरामपूर : ग्रामीण भागामध्ये शहराप्रमाणे आधुनिक व दर्जेदार शिक्षण देणारी प्राईड अकॅडमी सारखी आदर्श सुंदर शाळा माऊली व डॉ. वंदनाताई मुरकुटे यांनी अथक प्रयत्नातून नावारूपास आणली. असे प्रतिपादन प्राईड अकॅडमीच्या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम प्रसंगी श्रीरामपूर विधानसभेचे आ. हेमंत ओगले यांनी केले.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते, प्रमुख पाहुणे म्हणून आचार्य शुभम महाराज कांडेकर, नेत्रचिकित्सक डॉ. संजय शेळके, डॉ. वर्षाताई शिरसाठ, श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुधीर नवले, मा.उपनगराध्यक्ष संजय छल्लारे, अशोकचे माजी चेअरमन सुरेश गलांडे , बाबासाहेब काळे, दिगंबर शिंदे बाबासाहेब आदिक, माऊली प्रतिष्ठानचे ज्ञानेश्वर मुरकुटे, डॉ. वंदनाताई मुरकुटे, बजरंग दरंदले आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना आ. ओगले म्हणाले की प्राईड अकॅडमीची शैक्षणिक वाटचाल दिवसेंदिवस यशस्वीरित्या वाढत असून काही वर्षांपूर्वी लावलेल्या या शैक्षणिक रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर होत असून येथील विद्यार्थी संख्या ८५० पर्यंत गेली आहे. ही येथील चांगल्या व दर्जेदार शिक्षण व्यवस्थेची पावती आहे. या ठिकाणी जुनिअर कॉलेज पर्यंत शैक्षणिक व्यवस्था असून सीनियर कॉलेज साठी त्यांनी मान्यता घ्यावी आपण प्राईड अकॅडमीस सर्वतोपरी सहकार्य करू असे आश्वासन देतो असे ते म्हणाले. यावेळी संजय छल्लारे ,डॉ. संजय शेळके, व डॉ. वर्षाताई शिरसाठ यांनी प्राईड अकॅडमीच्या प्रगतीचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्राईड अकॅडमीच्या प्राचार्या प्रीती गोटे, टाकळीभान येथील प्राचार्य जयश्री वाडेकर यांनी शाळेच्या प्रगतीचा अहवाल सर्वांसमोर मांडला.
डॉ. वंदनाताई मुरकुटे यांनी प्रास्ताविक करून सर्वांच्या अनमोल सहकार्याने व आशीर्वादाने हा शैक्षणिक रथ आम्ही यशस्वीरित्या ओढत असल्याबद्दल सांगितले. यासाठी माऊली प्रतिष्ठानचे सर्व विश्वस्त मंडळ, माऊली प्रतिष्ठानचे संस्थापक आधारस्तंभ माऊली मुरकुटे यांचे सहकार्यही मोलाचे असल्याबद्दल त्यांनी सांगितले.
कार्यक्रम प्रसंगी माऊली प्रतिष्ठानचे विश्वस्त चंद्रकांत नाईक, नितीन भागडे, भरत साळुंके, विलास थोरात, शांताराम तुवर, अरुण कवडे,अर्जुन राऊत,प्रकाश जाधव, नयन गांधी , सौ सुप्रियाताई भोसले, सौ सिंधुबाई उंडे, श्रीमती लीलावती कोल्हे, डॉ. योगेश बंड, अभिजीत लांडगे , रामेश्वर उंदरे , नितीन हारदे, शिवम पटारे,तेजस बोरावके,अशोकचे संचालक ज्ञानेश्वर काळे,बी .डी. बडाख , राजेंद्र कोकणे, बंडू बोडखे ,विराज भोसले प्रा.लक्ष्मण कोल्हे ,कार्लस साठे,मार्केट कमिटीचे संचालक किशोर बनसोडे, राजू चक्रनारायण ,विलास दाभाडे ,प्रताप पटारे , सुदाम पटारे ,प्रताप कवडे, नानासाहेब तनपुरे ,अमोल नाईक,प्रशांत राऊत ,गणेश छल्लारे,,प्रकाश जाधव, बाबासाहेब तनपुरे, श्रीधर गाडे, कान्हा खंडागळे , डॉ.मंगेश उंडे ,सुनील पटारे, सचिन मुरकुटे , अनिल गोरे , योगेश उंडे, अवि लोखंडे , विनोद रन्नवरे ,गोरख पटारे ,अशोक गोरे ,भरत जाधव ,अप्पा रणनवरे , भैय्या पठाण सुनील बोडखे,भैरव कांगुणे, योगेश आसने , दिलीप हुरुळे , प्रभाकर पटारे ,गोरख दळे.ज्ञानेश्वर टेकाळे , किरण गायधने,युवराज पवार , प्रभाकर पवार ,नंदू सलालकर ,प्राचार्या प्रीती गोटे , प्राचार्य जयश्री वाडेकर , प्रदीप गोराणे आदीं सह शिक्षक , शैक्षणिक परिसरातील विविध संस्थांचे पदाधिकारी सरपंच, चेअरमन ,पालक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.