पीएम श्री नगरपालिका शाळा क्र. ७ मध्ये 'बाल आनंद बाजार' उत्साहात संपन्न


श्रीरामपूर : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी बाल आनंद बाजार सारखे उपक्रम उपयोगी पडत असल्याचे प्रतिपादन पालिका शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी संजीवन दिवे यांनी केले. शहरातील पीएम श्री नगरपालिका शाळा क्रमांक ७  येथे नुकताच बाल आनंद बाजार मोठ्या उत्साहात साजरा झाला. कार्यक्रमाचे उद्घाटन प्रशासनाधिकारी संजीवन दिवे यांनी केले. त्यावेळी ते बोलत होते.

या मेळाव्यास शिक्षण मंडळाचे वरिष्ठ लिपिक रुपेश गुजर, किशोर त्रिभुवन, संभाजी त्रिभुवन, मुख्याध्यापक अल्ताफ शाह, मुख्याध्यापिका स्मिता गायकवाड, शिक्षक कल्हापुरे, भिसे, शिक्षिका सौ पल्लवी बोरुडे, शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.

बाल मेळाव्यात शालेय विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थ, भाजीपाला, गृहउपयोगी वस्तू विक्रीसाठी आणले होते. यातून विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष व्यवहार ज्ञान मिळवले. या वस्तू खरेदीसाठी शालेय व्यवस्थापन समिती सदस्य, परिसरातील नागरिकांनी मोठा प्रतिसाद देऊन आमच्या बालचमुचा आनंद द्विगुणीत केला. याप्रसंगी शाळेच्या विद्यार्थ्यांनी शिवचरित्रावर पोवाडा सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ कल्पना जगताप, शिक्षिका श्रीमती वर्षा वाकचौरे, शिक्षक प्रशांत पठाडे, व अजय धाकतोडे सर यांनी विशेष परिश्रम घेतले.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post