तालुकास्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धेत जुने नायगाव प्राथमिक शाळेचे घवघवीत यश; ४ विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड


श्रीरामपूर : श्रीरामपूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नायगाव जुने या प्राथमिक शाळेने अशोकनगर प्राथमिक शाळेत नुकत्याच झालेल्या तालुकास्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धेत प्रथम क्रमांकाची चार, द्वितीय क्रमांकाचे एक व तृतीय क्रमांकाचे एक असे तालुकास्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धेत क्रमांक मिळवून घवघवीत यश मिळविले आहे. 

हस्ताक्षर  स्पर्धेत बालगटात चि.वेद गंगाराम नजन (इ.३ री) याने तालुक्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. वक्तृत्व स्पर्धेत किलबिल गटात चि.रुद्र शिवाजी लहारे (इ.२ री) याने तालुक्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे.वक्तृत्व स्पर्धा बालगटात चि.कैवल्य रवींद्र दरेकर (इ.३ री) याने तालुक्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. वेशभूषा सादरीकरण स्पर्धेत किलबिल गटात कु.आरोही किरण दातीर (इ.२ री) हिने तालुक्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. हस्ताक्षर स्पर्धेतही किलबिल गटात कु.आरोही किरण दातीर (इ.२ री) हिने तालुक्यात दुसरा क्रमांक पटकाविला आहे. वेशभूषा सादरीकरण स्पर्धेत बालगटात कु.श्रुती अविनाश लांडे (इ.३ री) हिने तालुक्यात तृतीय क्रमांक पटकाविला आहे.

या सर्व विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक संतोष वाघमोडे व शिक्षिका सुजाता सोळसे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.यशाबद्दल विद्यार्थी व शिक्षकांचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी साईलता सामलेटी, नगरपालिका प्रशासनाधिकारी संजीवन दिवे, श्रीम.मंगल गायकवाड, केंद्रप्रमुख राजू इनामदार, संजीवनी आंबिलवादे, नायगावचे सरपंच डॉ.राजाराम राशिनकर, उपसरपंच पुष्पाताई लांडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश लांडे, उपाध्यक्ष अशोक वाघ व सर्व सदस्य, ग्रामसेवक प्रेमचंद वाघमारे तसेच सर्व ग्रामस्थ व पालकांनी अभिनंदन केले आहे.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post