यावेळी माजी आ.भाऊसाहेब कांबळे, भाजप तालुकाध्यक्ष दीपक पटारे, नानासाहेब पवार, शरद नवले, जयबाबाचे बाळासाहेब आगे, गणेश मुदगुले, शंतनू फोफसे, नितीन भागडे, अशोक सातुरे, चंदू आगे आदी उपस्थित होते.
प्रभाग क्र.१६ मधील विविध विकास कामांच्या शुभारंभ प्रसंगी बोलताना ना.विखे म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह आम्ही फक्त जनतेच्या विकासाचे धोरण अवलंबत संपूर्ण राज्याच्या प्रगतीसाठी प्रयत्न केले. त्याच धर्तीवर केतन व स्नेहल खोरेंनी शहरात सर्वाधिक निधी आणत प्रभागातील जनतेच्या समस्या सोडविण्याचे काम केले. आगामी काळात खोरे यांच्या पाठीशी जनतेने राहून विकासाला साथ द्यावी आम्ही त्यांना नक्कीच ताकद देऊ असे अभिवचन विखे पाटलांनी दिले.
तर केतन खोरे यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार मानत गेल्या ८ वर्षात केलेल्या विकासकामांची माहिती दिली.
यावेळी लक्ष्मी आई रस्ता, अशोका पार्क ते गाढे यांचे घर दक्षिण-उत्तर रस्ता डांबरीकरण, अशोका पार्क पलीकडील लबडे पाटील यांचे घरासमोरील रस्ता डांबरीकरण, पूर्णवादनगर चर ते शेलार, भोंगळ वस्तीकडे जाणारा रस्ता डांबरीकरण, स्व.राजेंद्र महांकाळे यांचे घर ते गौतमनगर ते करडीले सर रस्ता सिमेंट काँक्रीटीकरण, डॉ.भारत गिडवाणी यांचे घरासमोरील रस्ता डांबरीकरण, म्हसोबा महाराज चौक येथे हायमास्ट, पूर्णवादनगर गाढे यांचे घराच्या कॉर्नरला हायमास्ट बसविणे आदी कामांचा शुभारंभ करण्यात आला.