जिल्ह्यात समाजवादी पार्टी विधानसभा निवडणूक लढवणार : जोएफ जमादार


श्रीरामपूर : श्रीरामपूर येथील समाजवादी पार्टीच्या जिल्हा कार्यालयात नुकतीच जिल्हाध्यक्ष जोएफ जमादार यांच्या अध्यक्षतेखाली समाजवादी कार्यकर्ता, पदाधिकारी यांची मिटिंग संपन्न झाली. यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील विधानसभेत समाजवादी पार्टीचे उमेदवार रिंगणात उतरविण्याविषयी व इतर अनेक विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी समाजवादी पार्टी  पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

सध्या देश आणि राज्यातील राजकीय वातावरण पाहता कोणता नेता कोणत्या पक्षात जाईल याचे सांगता येणे मोठे दुरापास्त झाले आहे. सकाळी एका पक्षात असणारा नेता सायंकाळी दुस-या पक्षात प्रवेश करत आहे. सकाळी जो विरोधकांच्या विषयी विरोधात बोलत होता, सायंकाळी तोच विरोधकांच्या समुहात सामील होत मांडीला मांडी लावून त्यांचे गुणगाण गात आहे. हे सर्व पाहून मतदार राजामध्ये प्रचंड प्रमाणात संताप आणि चीड यासोबतच संभ्रमणाचे वातावरण निर्माण झाले आहे. म्हणून सर्व जाती धर्माला बरोबर घेवून चालणारा आणी सर्वांना समान न्याय देणारा असा उमेदवार, असा पक्ष समस्त जागरुक मतदारांना हवा आहे, आणी तो पक्ष केवळ समाजवादी पार्टी हा पक्ष असल्याने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.अखिलेशजी यादव, प्रदेशाध्यक्ष आ. अबु असिम आझमी यांच्या आदेशान्वये अहमदनगर जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात समाजवादी पार्टी आपले उमेदवार उभे करणार असल्याचे पक्षाचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष जोएफ जमादार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

समाजवादी पार्टी हा पक्ष सर्व जाती धर्मांना बरोबर घेवून चालतो, सर्वांना समान न्याय देण्याची भुमिका ठेवतो, उपेक्षित आणि दुर्लक्षितांच्या ज्वलंत प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठवित राहतो, करीता समाजवादी पक्षाने निवडणूक लढवावी अशी समाजवादी पार्टी कार्यकर्ता आणी जिल्ह्यातील समस्त मतदारराजांकडून वारंवार सातत्याने मागणी होत असल्याने जिल्हाध्यक्ष जोएफ जमादार यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच शहरातील समाजवादी पार्टी  कार्यालयात मिटिंग घेण्यात आली, त्यात निवडणूक विषयांसह अनेक ज्वलंत विषयांवर चर्चा करण्यात आली.यामध्ये प्रामुख्याने संगमनेर,राहुरी,राहाता (शिर्डी), या विधानसभा मतदारसंघापैकी कोणत्याही एका मतदार संघातून जोएफ जमादार यांनी उमेदवारी करावी असा पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी अग्रह धरल्याने सदरील ठिकाणी जोएफ जमादार हे स्वतः उमेदवार असणार असल्याचे सांगितले गेले.

अहमदनगर जिल्ह्यातील अनेक नेते योग्यतेचे असल्याने यातील योग्य उमेदवारास समाजवादी पार्टी निवडणूक रिंगणात उतरविणार असल्याचे सांगण्यात आले. समस्त नागरीकांच्या मुलभूत गरजा व त्यांचे हक्क, अधिकार याविषयी समाजवादी पार्टी नेहमीच सातत्याने आवाज उठवित असल्याने सोबतच अहमदनगर जिल्ह्यातील समाजवादी पार्टी चे कामे देखील पुर्वीपासून मोठ्या प्रमाणात असल्याने विधानसभा निवडणूकीत हमखास यश मिळणार असल्याचे देखील यावेळी जिल्हाध्यक्ष जोएफ जमादार यांनी सांगितले.

या वेळी आसिफ तांबोळी, अय्यूब पठाण, अब्दुल सैय्यद, सुल्ताना शाह, राजू शेख, मतीन शेख, अल्तमश शेख, गुफ्फरन जमादार, जैद शेख,संजय वाघ,अनवर तांबोळी, इमरान मंसूरी, अमजद शेख, सलीम शेख, शहेजाद शेख , कलीम शेख, रियाज सैय्यद, उसामा शेख, अली शेख, शोएब शेख, साहिल शेख, फरहान शेख, तौसीन मंसूरी, रफीक शेख, मुबाशहीर पठाण, अरबाज़ क़ुरैशी,अमन इनामदार, आदि  मान्यवर उपस्थित होते.

यामध्ये प्रामुख्याने संगमनेर,राहुरी, राहाता (शिर्डी), या विधानसभा मतदारसंघापैकी कोणत्याही एका मतदार संघातून जोएफ जमादार यांनी उमेदवारी करावी असा पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी अग्रह धरल्याने सदरील ठिकाणी जोएफ जमादार हे स्वतः उमेदवार असणार असल्याचे सांगितले गेले.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post