'साबां'चे कार्यकारी अभियंता श्रीनिवास वर्पे, उपअभियंता व्ही बी शिंदे व कंत्राटदाराची मिलीभगत ; कोट्यवधी रुपयांचा रस्ता उखडला, अधिकारी मालामाल..!


श्रीरामपूर ( राजेश बोरुडे ) : संगमनेर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीनिवास वर्पे, कोपरगाव सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे उपभियंता व्ही बी शिंदे व कंत्राटदाराच्या मिलिभगतीमुळे कोट्यवधी रुपये खर्चून बनविलेला कोपरगाव-पुणतांबा रस्ता ठिकठिकाणी उखडला व खचला आहे. या रस्त्याच्या कामात लोकसेवक एस वर्पे व व्ही बी शिंदे यांनी मोठी टक्केवारी घेतल्याने कॉन्ट्रॅक्टरवर कोणतेही कारवाई केली जात नसल्याचा आरोप राजेश बोरुडे यांनी केला आहे. दरम्यान, कोपरगाव-पुणतांबा रस्त्यावर जागोजागी पडलेले खड्डे त्वरित दर्जेदार पद्धतीने बुजवून ठेकेदारासह संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी राजेश बोरुडे यांनी केली आहे. यासंदर्भात राजेश बोरुडे यांनी प्रशासनाकडे सविस्तर तक्रार केली आहे.

सार्वजनिक बांधकाम विभाग संगमनेर यांच्या अधिनस्त व कोपरगाव उपविभागाच्या हद्दीतील पुणतांबा-कोपरगाव रस्त्याच्या कामात कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. रस्त्याचे निकृष्ट काम करून लोकसेवक श्रीनिवास वर्पे व व्ही बी शिंदे यांनी शासनाची फसवणूक केली आहे. रस्त्याच्या कामात मोठी अनियमितता आहे. वापरलेले मटेरियल अत्यंत दर्जाहीन असल्याने रस्त्यावर जागोजागी मोठे-मोठे खड्डे पडले आहेत.अनेक ठिकाणी रस्ता खचला आहे. रस्त्याला साईड मार्जिन करण्यात आली नाही. इन्स्टिमेंट प्रमाणे रस्त्याचे काम केलेले नसल्याचेही राजेश बोरुडे यांनी तक्रारीत म्हंटले आहे. 

रस्त्याचे काम सुरु करण्यापूर्वी साहित्त्याची तपासणी करणे बंधनकारक आहे. मटेरियलची टेस्टिंग केली का नाही? केली असेल तर संबंधित अधिकाऱ्यांनी कॉन्टॅक्टरला निकृष्ट मटेरियलचा वापर का करू दिला? रस्ता लागलीच उखडलाच कसकाय? असे अनेक सवाल राजेश बोरुडे यांनी उपस्थित केले आहे. रस्त्याच्या कामात अनियमितता ठेऊन कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांसह ठेकेदारावर कायदेशीर कारवाई न झाल्यास आंदोलन छेडण्याचा  इशारा राजेश बोरुडे यांनी दिला आहे.




Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post