श्रीरामपूर : सध्या महाराष्ट्र मध्ये पावसाने प्रचंड धुमाकूळ घातलेला आहे. हवामानामध्ये झालेल्या प्रचंड बदलामुळे हा पाऊस मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रात सह कोकण, विदर्भ, मराठवाडा, परभणी, बीड, नांदेड, नगर जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे शेतकरी बळीराजा आनंद आहे. परंतु, दुसरीकडे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकरी बळीराजा चिंतेमध्ये देखील आहे. सध्या राज्यातील धरणे जवळपास शंभर टक्के भरत आहे. जायकवाडी धरण देखील 90% भरले आहे. यावर्षी जायकवाडी देखील शंभर टक्के भरणार आहे. सरासरी पेक्षा या वर्षी 102% पाऊस होणार आहे. यापुढे गणपती आणि नवरात्र देखील आपल्याला परतीचा मान्सून मिळणार आहे. त्यामध्ये देखील प्रचंड पाऊस असेल. हा पाऊस खूप मोठ्या प्रमाणामध्ये असल्यामुळे शेतकरी, नागरिकांनी काळजी घ्यावी, अशी माहिती महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध हवामान तज्ज्ञ दत्तात्रय खेमनर यांनी दिली आहे.
खेमनर हे नेहमी सोशल मीडियाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना, व्यवसायिकांना हवामाना संदर्भात अंदाज देत असतात. हवामानामध्ये झालेले बदल, पाऊस सुरू होणे, बंद होणे, कोणत्या तारखेला पडेल तारीख, वेळ, तालुका, जिल्हा, गावाचे नाव सांगतात. सोशल मीडियावरती सध्या हवामान तज्ञ दत्तात्रय खेन्नार यांचे हवामान तज्ञ दत्तात्रय खेमनर यांचे पावसासंदर्भात सांगितलेले व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.
त्यांनी अनेक व्हिडिओमध्ये हवामान खाते आणि पंजाबराव डंक या देखील चॅलेंज केले आहे. आत्तापर्यंत त्यांचा एकही हवामानाचा अंदाज चुकलेला नाही. त्यामुळे त्यांना डॉक्टर किसान बायो ऍग्रो रिसर्च इन्स्टिट्यूट कडून हवामान तज्ञ पुरस्कार देण्यात आला आहे.दत्तात्रय खेमनर यांच्या हवामान अंदाज मुळे अनेक शेतकरी,व्यावसायिक , नागरिक यांना मोठ्या प्रमाणात फायदा झाला आहे.