सौंदर्य व विलक्षण बुद्धीमत्तेची धनी असलेल्या रश्मी शिंदे हिच्या प्रतिनिधीत्वामुळे टोकीयो येथे होणार्या मिस इंटरनॅशनल स्पर्धेत विजेतेपदाला गवसणी घालण्याची सुवर्णसंधी भारताला प्राप्त होणार आहे. श्रीरामपूरसारख्या निमशहरी भागातून येवून जागतिक स्पर्धेच्या विजेतेपदासाठी प्रतिनिधीत्व करणे केवळ अविश्वनीय व थक्क करणारे आहे. रश्मी शिंदे हिने प्राथमिक शिक्षण सेंट झेविअर स्कूल, श्रीरामपूर या शाळेतून पूर्ण केले. तिचे मराठी, इंग्रजी या भाषांवर मोठे प्रभुत्व आहे. वक्तृत्व शैलीचे कौशल्य प्राप्त केले आहे.
उच्च शिक्षणातही तिने बी. टेकची पदवी व्हीजेटीआय, मुंबई या कॉलेजमधून संपादन केली आहे. रश्मी ही राष्ट्रीय बास्केटबॉल खेळाडू तसेच राष्ट्रीय स्केटर खेळाडू म्हणून ओळखली जाते. तिने कथ्थक सार‘या शास्त्रीय नृत्यात प्राविण्य मिळविले आहे. रश्मी ही ज्येष्ठ विधीज्ञ ऍड. स्व. रावसाहेब शिंदे व श्रीमती शशिकला शिंदेची नात व डॉ. राजीव शिंदे व डॉ. प्रेरणा शिंदे यांची कन्या आहे.