तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये ३६ विद्यालय व कॉलेजमधील जवळपास ४०० ते ४५० विद्यार्थिनी खेळाडूंनी सहभाग घेतला होता. उद्घाटनाच्या समारंभ प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर ज्योती, यांनी पुष्पगुच्छ देऊन शाळेच्या वतीने श्रीरामपूर क्रीडा समितीचे अध्यक्ष श्री कुंडलिक शिरोळे, सहसचिव अजित कदम, जे टी एस विद्यालय व जुनिअर कॉलेजचे उपमुख्याध्यापक श्री.पोपटराव गावडे, श्री काकासाहेब चौधरी यांचा सत्कार केला. तसेच श्रीरामपूर तालुका क्रीडा समितीच्या वतीने कुंडलिक शिरोळे यांनी संत तेरेजा गर्ल्स हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सिस्टर ज्योती यांचा सत्कार केला.
याप्रसंगी मुख्याध्यापिका सिस्टर ज्योती यांनी आपल्या भाषणाद्वारे मुलींनी कोणत्याही स्पर्धेमध्ये पूर्ण ताकतीने सहभाग घेतला पाहिजे आणि जसेच तसे उत्तर द्यायला शिकले पाहिजे. यावेळी श्री गावडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
स्पर्धेसाठी पंच म्हणून श्री ढेरे,श्री वमने,श्री साळूंके,श्री जे के पुजारी,श्री कोल्हे, इंगळे सर, श्री कणसे,सौ मेहेत्रे,सौ दानी,सौ दुधाळे,श्री दुधाने यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वी करण्याकरीता श्रीरामपूर तालुका क्रीडा समितीचे उपाध्यक्ष श्री नितीन बलराज यांनी अथक परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. सुहास ब्राह्मणे, तर आभार प्रदर्शन काकासाहेब चौधरी यांनी केले.