सायखिंडी विद्यालयाची विद्यार्थिनी स्नेहा गोरे देशात प्रथम


संगमनेर : नवी दिल्ली येथील अग्निपंख फाऊंडेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या राष्ट्रीय पातळीवरील वक्तृत्व स्पर्धेत संगमनेर तालुक्यातील सायखिंडी येथील श्री मनोहर बाबा विद्यालयात वध इक्षढ घेत असलेली  इयत्ता आठवीची विद्यार्थीनी कुमारी स्नेहा सुर्यकांत गोरे हिने देशात ग्रामीण भागातील प्रथम क्रमांक मिळविल्या बद्दल तिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. 

    संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागातील श्री मनोहर बाबा विद्यालयात अनेक शालेय व सहशालेय उपक्रम मुख्याध्यापक श्री. संदीप सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली वर्षेभर सुरू आहेत . विद्यालयात गेली २४ वर्षे योगासने, प्राणायाम उपक्रम राबविण्यात येत आहे. सकाळी शिष्यवृत्ती, चित्रकला मार्गदर्शन वर्ग, सायकल बँक, किशोर वयीन विद्यार्थीनी,विद्यार्थ्यांना जिवन कौशल्य शिक्षण , एक विद्यार्थी एक वृक्ष, अधिकारी विद्यार्थी भेटीला, मनोहर व्याख्यान माला, सप्तरंगी इंग्रजी, मराठी, हिंदी परिपाठ , स्वच्छ सुंदर व हरित शाळा उपक्रम यामुळे जिल्ह्यात नावलौकिक या शाळेने मिळविला आहे. 

कुमारी स्नेहा गोरे हिच्या यशाबद्दल श्री मनोहरदास बाबा शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे सर्व पदाधिकारी, शाळा व्यवस्थापन समिती, सायखिंडी पंचक्रोशीतील सर्व संस्थांचे पदाधिकारी व समस्त ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post