बेलापुरात जैन मंदिरात आणखी दोन पंचधातुच्या मूर्ती सापडल्या


बेलापूर ( प्रतिनिधी ) : येथील श्वेतांबर श्री संभवनाथजी जैन मंदिराच्या जिर्णोध्दाराचे काम सुरु असतानाच काही दिवसापूर्वी मंदिराच्या भिंतीमध्ये पार्श्वनाथ भगवानांची भंग पावलेली मूर्ती सापडली होती. त्यानंतर काम सुरु असतानाच पुन्हा पंच धातुच्या भगवान पार्श्वनाथ  महाराजांच्या दोन मूर्त्या सापडल्या आहेत.

            बेलापूर ही जुनी बाजारपेठ आहे. येथे अनेक जुने राजवाडे तसेच पुरातन मंदिरेही आहेत त्यातीलच एक जैन मंदिर बेलापुरच्या बाजारपेठेत होते. या मंदिराचा जिर्णोध्दर करण्याचे काम मंदिराचे विश्वस्त अजय डाकले यांनी हाती घेतलेले आहे. ते काम सुरु असतानाच भिंतीमध्ये भगवान पार्श्वनाथ यांची मोठी मूर्ती सापडली. त्यावर सवंत १७४५ असे लिहलेले आहे. त्यावरुन हे मंदिर सुमारे चारशे वर्षापूर्वीचे असावे, असा अंदाज आहे. ती सापडलेली मूर्ती भंग पावलेली आहे. त्यानंतर कालच आणखी दोन लहान मूर्ती सापडली आहे.या सापडलेल्या मूर्ती पुरातन आहेत.त्यामुळे हे मंदिरही पुरातन असुन भाविकांच्या नवसाला पावणारे असावे,अशी चर्चा आहे ही वार्ता समजताच अनेक भाविकांनी मंदिर परिसरात भेट देवुन भगवान श्री पार्श्वनाथ यांचे दर्शन घेतले.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post