या कार्यक्रमास श्रीरामपूर नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी अयुब सय्यद,पालिका शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी संजीवन दिवे, ग्रंथपाल स्वाती पुरे, शिक्षण मंडळाचे किशोर त्रिभुवन, रुपेश गुजर, संभाजी त्रिभुवन, सर्व शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक, विद्यार्थी, पालक, नागरिक, नगरपालिका अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात उपमुख्याधिकारी अयुब सय्यद यांनी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर तो नगरपालिका, जिल्हा परिषद शाळेतूनच शक्य असल्याचे नमूद केले व सर्व विद्यार्थ्यांचे सादरीकरण पाहून कौतुक केले.
प्रशासनाधिकारी संजीवन दिवे यांनी उपस्थित नागरिकांना आपले पाल्य नगरपालिका शाळेत टाका, त्यांच्या सर्वांगीण विकासाची हमी आम्ही देतो, असे आवाहन केले. नगरपालिका शाळांमध्ये सर्व सुविधा उपलब्ध आहेत, सर्व शाळा डिजिटल झालेल्या आहेत, अनुभवी व तज्ञ शिक्षक वर्ग उपलब्ध आहे त्यामुळे सर्व नागरिकांनी नगरपालिका शाळेमध्ये आपल्या पाल्यांना घातले पाहिजे असे आवाहन केले.
या स्पर्धेत मुलांना मिळालेल्या यशासाठी अध्यापिका सौ वर्षा वाकचौरे, मुख्याध्यापिका कल्पना जगताप, प्रशांत पठाडे, अजय धाकतोडे यांनी परिश्रम घेतले. या स्पर्धेत मिळालेल्या यशाबद्दल पीएम श्री नगरपालिका शाळा क्रमांक सात या शाळेचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.
केंद्र सरकारच्या पीएम श्री योजनेमध्ये नगरपालिका शाळा क्रमांक -७ शाळेची निवड झाली असल्याने शाळेमध्ये अमुलाग्र बदल झालेले आहेत. व शाळा ग्रीन स्कूल बनलेली आहे. शाळा डिजिटल बनली आहे, शाळेत सीसीटीव्ही बसवण्यात आले आहे, शाळेला नव्याने कम्प्युटर लॅब, सायन्स लॅब,ग्रंथालय मंजूर झालेले आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांची अंमलबजावणी या शाळेतून होणार आहे त्यामुळे आपल्या पाल्यांना सदर शाळेमध्ये ऍडमिशन घेण्याचे आवाहन शाळा व्यवस्थापन समितीने केले आहे.