याप्रसंगी बोलताना जे.जे. फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष जोएफ जमादार म्हणाले की, आपल्या श्रीरामपूर शहरात अनेक रुग्णवाहीका आहेत त्यांची सर्व्हिसही चांगली आहे, परंतु ज्यांच्याकडे पैसा आहे ते तात्काळ ही सर्व्हिस उपलब्ध करून घेण्यात यशस्वी ठरतात मात्र ज्यांच्याकडे पैसे नाहीत अशा उपेक्षित घटकातील रुग्णांची मोठी आडचण निर्माण होते, शासन स्तरावर जरी काही योजना अत्यंत चांगल्या आहेत मात्र प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी ही पुरेपूर होत नसल्याने गोर - गरीब उपेक्षित घटकातील रुग्णांना प्रसंगी मोठ्या समस्यांचा सामना करणे भाग पडत असल्याचे अनेक उदाहरणे आहेत करीता जे.जे. फांऊडेशनच्यावतीने गोर - गरिब आणी उपेक्षित घटकातील रुग्णांसाठी मोफत रुग्णवाहिका सेवेकरीता आज स्वातंत्र्य दिनी सामाजिक कार्यकर्ते आणी समस्त नागरिकांच्या उपस्थितीत रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा साजरा होत असताना मोठा आनंद होत आहे,याकामी आमचे मार्गदर्शक आणी सर्व सहकारी मित्र तथा जे.जे. फाऊंडेशन पदाधिकारी, सदस्यगण या प्रत्येकाचे या मागे मोठे परिक्षम आणी निर्पेक्ष योगदान असल्याने आजवर केलेल्या अनेक सामाजाभिमुख उपक्रमे राबविण्यात जे जे फाऊंडेशन यशस्वी झाले असल्याचे ते म्हणाले.
याप्रसंगी आमदार लहु कनडे, अविनाश आदिक, माजी आ.भाऊसाहेब कांबळे, प्रशांत लोखंडे, अभिजित लिप्टे, उपनगराध्यक्ष हाजी अंजूम भाई शेख, मुजफ्फर भाई शेख, नगरसेवक मुख्तारभाई शाह, राजेश अलघ, श्रीनिवास बिहाणी, याकूब बागवान, सलीमखान पठाण, साजिद मिर्जा, आदिल मखदूमी, महबूब क़ुरैशी, तिलक डुंगरवाल, रमादेवी धिवर रियाज खान पठाण, मुन्नाभाई पठाण, इज्जु इनामदार,नजीर (मामु) शेख, जफर शाह, डॉ सलीम शेख, इकबाल काकर,हाजी फय्याजभाई बागवान, जाकिरभाई शहा, आदींनी आपली मनोगते व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन रज्जाकखान पठाण यांनी केले तर आभार हाजी आरिफभाई बागवान यांनी मानले. यावेळी हुजैफ जमादार, फ़िरोज़ पठाण, सलीम शेख, (ss) जावीद तांबोळी, अबुल मनियार, हाजी पापा, शन्नू हाजी, फ़िरोज़ शाह, अकबर पठाण, तौफीक शेख, मुब्बशिर पठाण, साद पठाण, अकील क़ुरैशी, निळे सर आदि मान्यवर उपस्थित होते.