जुने नायगाव प्राथमिक शाळेत ७८ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात संपन्न; मिशन आपुलकीतून शाळेस साऊंड सिस्टीम प्रदान


 श्रीरामपूर : तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा नायगाव जुने शाळेत ७८ व्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाचे ध्वजारोहण ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण पवार यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस पाटील राजेंद्र राशिनकर होते.मिशन आपुलकीतून शाळेला १८,०००/-रुपयांची साऊंड सिस्टीम प्रदान करण्यात आली.
     मुख्याध्यापक संतोष वाघमोडे यांनी शालेय अहवालवाचनात शाळेच्या प्रगतीची माहिती देऊन अपूर्ण भौतिक सुविधा पूर्ण करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची अपेक्षा व्यक्त केली. शिक्षणप्रेमी ग्रामस्थ सुभाष बोर्डे, सतिष लांडे,डॉ.संदीप लांडे,उपसरपंच सौ.पुष्पाताई लांडे यांनी शाळा विकासासाठी ३,१०० रुपये देणगी दिली.श्यामसुंदर लांडे यांनी सर्व विद्यार्थी व ग्रामस्थांना लापशी व मसाला भाताचे भोजन दिले.श्री.रविंद्र दरेकर यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेतील १००० रुपयांच्या सर्व विद्यार्थ्यांना प्रत्येकी एका वहीचे वाटप केले.१५ ग्रामस्थ व पालकांनी मुलांसाठी बिस्किट व चॉकलेट रूपात खाऊ दिला.
           कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी केलेल्या उत्कृष्ट भाषणास सरपंच डॉ.राजाराम राशिनकर यांनी बक्षीस देऊन कौतुक केले.शाळेची होत असलेली प्रगती व शाळेतील शिक्षकांच्या चांगल्या कामाबद्दल ग्रामस्थ व पालकांनी दोन्ही शिक्षकांचा सन्मान केला.
          यावेळी कार्यक्रमास सरपंच डॉ.राजाराम राशिनकर, उपसरपंच पुष्पाताई लांडे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश लांडे,माजी अध्यक्ष संतोष राशिनकर,महेश राशिनकर, संपत लांडे,नानासाहेब राशिनकर, डॉ.संदिप लांडे, सुनिल दातीर,राजेंद्र लांडे,बापूसाहेब लांडे,रघुनाथ लांडे,संदिप सदाफुले,रविंद्र दरेकर,बाळासाहेब सोनवणे, गोरक्षनाथ राशिनकर,अंकुश पवार,रमेश दातीर,प्रमोद भवार,सूर्यभान दातीर,रमाकांत लांडे,फकीरचंद मोरे,संदिप धसाळ,हरिभाऊ राशिनकर, रविंद्र लांडे,दिगंबर लांडे,अविनाश लांडे,देविदास दातीर,दिपक राशिनकर,विद्यासागर लांडे, विश्वंभर दातीर,ज्ञानेश्वर बर्डे,गणेश राशिनकर,बलभीम लहारे,यशवंत लांडे,सागर लहारे,केशव नजन,इंदुबाई लांडे, लताबाई भुसारी,निता लांडे,पूजा लांडे,मनिषा राशिनकर,हिराबाई त्रिभुवन,नंदा दातीर,तुळसाबाई नजन,उषा राशिनकर,मिताली दातीर,प्रणाली दातीर,मधु लांडे,अश्विनी लांडे,शोभा भुसारी,स्वाती राशिनकर,सरिता राशिनकर,शितल लांडे,अनिता लांडे,भाऊसाहेब बोर्डे आदि पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्यने उपस्थित होते.सूत्रसंचालन संतोष वाघमोडे यांनी तर शिक्षिका सुजाता सोळसे यांनी सर्वांचे आभार मानले.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post