श्रीरामपुरात आज सकल हिंदू समाजाचे हिंदु महासंमेलन व दहीहंडी; महंत श्री रामगिरी महाराज व व्यास महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत


श्रीरामपूर : आज दि.२७ ऑगस्ट २०२४ सायंकाळी ६:०० वाजता विश्व हिंदू परिषदेच्या ६१ व्या वर्धापन दिनानिमित्त गोपालकाल्याच्या मुहूर्तावर विहिंपचे हिंदु महासंमेलन आझाद मैदान मेनरोड, श्रीरामपुर येथे आयोजित केले आहे.

आपल्या हिंदू समाजावर शेकडो वर्षे तूर्क, मोगल, इंग्रज आदी परकीय आक्रमकांनी अत्याचार क़रून शासन केले. स्वातंत्र्य मिळून ७८ वर्षे उलटून गेली तरी आजही हिंदू धर्मावर आक्रमणे होतच आहेत. बांगला देशातील हिंदूच्या किंकाळ्या आपण नुकत्याच ऐकलेल्या आहेत. अत्याचार डोळ्यांनी पाहीले आहेत. आमच्याच देशात बहुसंख्य असूनही आम्ही सुरक्षीत आहोत का? या प्रश्नाचे उत्तर आम्ही 'हो' म्हणून देऊ शकतो का ?

हिंदू समाजाची व आपल्या भारतमातेची सुरक्षा याचा विचार करूनच साठ वर्षापूर्वी म्हणजे १९६४ सालातील कृष्ण जन्माष्टमीच्या शुभमुहूर्तावर विश्व हिंदू परिषदेची स्थापना झाली. मंगळवार दि. २७ ऑगस्ट २०२४, वेळ सायं. ६:०० वा. विश्व हिंदू परिषदेच्या ६१ व्या वर्धापन दिनानिमित्त गोपालकाल्याच्या मुहूर्तावर विहिंपचे हिंदु महासंमेलन व गोपाल काला व दहीहंडीचा कार्यक्रम आझाद मैदान, मेनरोड, श्रीरामपुर येथे होणार आहे. 

या हिंदू महासंमेलन प्रमुख वक्ते प.पू. महंत श्री रामगिरी महाराज, प.पू. श्री महेशजी व्यास महाराज, कार्यक्रमाचे अध्यक्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जिल्हा संघचालक किशोर आण्णा निर्मळ, धर्मरक्षक योगेश सूर्यवंशी, धर्मरक्षक श्री अभिजीत सरोदे सर आदींसह मान्यवर संताचे आशिर्वाद व मार्गदर्शन लाभणार आहे. आपण या हिंदू महासंमेलनात उपस्थित रहावे, असे आवाहन श्रीरामपूर पालक श्री कुणाल करंडे सेवा विभाग प्रमुख डॉक्टर दिलीप शिरसाठ राजेंद्र गुप्ता विद्या वाघ पूनम गांधी श्रीराम कौदरे पा. अमित मुथा समर्थ सोनार मंगेश भोसले हितेश निकुंभ सचिन आजगे आदिनाथ सुपेकर पवन परदेशी, विश्व हिंदू परिषद श्रीरामपूर बजरंग दल- दुर्गा वाहिनी- मातृशक्ती गोरक्षण गो संवर्धन विभाग यांच्या वतीने केले आहे.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post