७८ वा स्वातंत्र्य दिन सोमैय्या विद्या विहार संचलित श्री शारदा इंग्लिश मिडीयम स्कूल कोपरगाव मध्ये उत्साहात संपन्न झाला. या दिवशी विद्यार्थ्यांनी इंग्लिश,मराठी हिंदी व संस्कृत भाषेमध्ये भाषणे केली. या सर्वांमध्ये यू केजी चा विद्यार्थी अर्णव कुलकर्णी यांनी केलेले संस्कृत मधील भाषणांनी सर्व उपस्थित आमचे लक्ष वेधले.
पाच वर्षाचा मुलगा संस्कृतमध्ये भाषण करताना बघून सर्वजण आश्चर्यचकित झाले.सर्वाचा वाटते संस्कृत भाषा ही अवघड भाषा आहे असा एक गैरसमज समाजामध्ये पसरलेला आहे तो गैरसमज अर्णवने संस्कृत मध्ये भाषण करून मोडून काढलेला. अर्णवच्या भाषणानंतर सर्वत्र टाळ्यांचा कडकडाट झाला. यावेळी शाळेचे प्राचार्य के एल वाकचौरे, उपप्राचार्या सौ शुभांगी अमृतकर,सर्व पर्यवेक्षिका सौ प्रज्ञा पहाडे, सौ पल्लवी ससाणे, सौ नैथलीन फर्नांडिस,शाळेचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.