रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ श्रीरामपुरातून शेकडो कार्यकर्ते सराला बेटात; 'आम्ही जे बोललो त्याला शास्त्राचा आधार' : महंत रामगिरी महाराज


श्रीरामपूर : आम्ही जे बोललो त्याला शास्त्राचा आधार आहे. बांगलादेशात जी परिस्थिती झाली तशी परिस्थिती आपल्याकडे देखील होऊ शकते, याची कल्पना देण्याच्या दृष्टीने व झोपलेल्या हिंदू समाजाला जागृत करण्याच्या दृष्टीने, समाजात  अनिष्ट प्रथा आहेत अशा अनिष्ट प्रथांनां मुठमाती  द्यावी. आमचे आदर्श कसे असले पाहिजेत, या संदर्भाने मी भाष्य केले असल्याचे सराला बेटाचे महंत रामगिरीजी महाराज यांनी श्रीरामपुरातून समर्थन देण्यासाठी आलेल्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांसमोर सांगताना स्पष्ट केले .

महंत रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ श्रीरामपूर वरून मोठ्या संख्येने श्रीरामपूर शहर व तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते सकाळी सरला बेट येथे केले होते . तेथे रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ त्यांचा सत्कार करण्यात आला . त्याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश चित्ते, मनसेचे जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे , शिवसेनेचे नेते प्रशांत लोखंडे, देविदासजी चव्हाण , आध्यात्मिक आघाडीचे उत्तर महाराष्ट्राचे संयोजक बबन मुठे , उद्योग आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश आसने, माजी नगरसेवक दीपक चव्हाण , संजय यादव आदींसह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना महंत रामगिरीजी महाराज पुढे म्हणाले की आदर्श जर चांगले नसतील तर समाज केव्हाही रस्सातळाला जाऊ शकतो. आम्हाला प्रवचनातून सर्व धर्मांबद्दल आदरच आहे. धर्मग्रंथातील वस्तुस्थिती मी समाजासमोर मांडली. हा घटनेने दिलेला अधिकार आहे. हिंदू समाज सहनशील आहे. हिंदुत्वादी संघटनांनी संयमाने शांततेने कुठले गालबोट लागणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन महंत रामगिरीजी महाराज यांनी उपस्थितांना केले.

याप्रसंगी भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रकाशित ते म्हणाले की भारताच्या सीमांवरील सुरक्षा धोक्यात आहे, तशी अंतर्गत सुरक्षाही धोक्यात आहे. त्यादृष्टीने देशाची अखंडतेचा अविभाज्य घटक असलेल्या हिंदू समाजाला जागृत करणे गरजेचे आहे. सरला बेटाचे मंहंत रामगिरीजी महाराज यांनी अखंड हरिनाम सप्ताह मध्ये आपल्या प्रवचनात हिंदू समाजाला जागृत करण्यासाठी भाष्य केले. महंत रामगिरीजी महाराज देशातले पहिले महंत आहेत की ज्यांनी परमार्था बरोबर हिंदुत्व आणि राष्ट्रवाद मांडला. यादृष्टीने साऱ्या हिंदू समाजाने रामगिरीजी महाराजांचे समर्थन केले पाहिजे. म्हणून महाराजांच्या समर्थनार्थ त्यांचा सत्कार करण्यासाठी आम्ही आलो आहोत. सर्व संतमंहतांनी आपल्या प्रवचनातून केवळ परमार्थ न सांगता हिंदुत्व, राष्ट्रवाद, आणि देशभक्ती सांगून समाजाचे प्रबोधन केले पाहिजे . आणि देशाची अखंडता टिकवली पाहिजे. त्यादृष्टीने रामगिरीजी महाराज यांचे भाषण अत्यंत महत्त्वाचे आहे.

याप्रसंगी मनसेचे जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे, शिवसेनेचे प्रशांत लोखंडे, बबन मुठे , सुरेश आसने नगरसेवक दीपक चव्हाण, शिवसेनेचे प्रदीप वाघ, प्राध्यापक श्री वमणे आदींची महाराजांच्या समर्थनार्थ भाषणे झाली. याप्रसंगी बाळासाहेब गाडेकर , सोमनाथ पतंगे , रमेश सातपुते , महेश विश्वकर्मा  ,विशाल जाधव , देविदास वाघ , नारायण पिंजारी , काका शेलार  ,दादासाहेब कोकणे , अशोक कार्ले , सतीश कुदळे, डॉ नवथर , प्रवीण रोकडे , रवींद्र चव्हाण , विलास पाटणी,भास्कर सरोदे , अमोल साबणे , संदीप विश्वंभर  ,अक्षय नागरे  ,नितीन जाधव  ,मच्छिंद्र पांढरे , राजू शिंदे , कांतीलाल फुलवर  ,दत्ता पवार , किरण वूईके  ,नवनाथ पवार , सिद्धार्थ साळवे , विशाल त्रिवेदी , टायगर ग्रुपचे बबन जाधव , सचिन वायकर, पप्पू मोरे, नवनाथ लांडे , माऊली वेताळ, संदीप आदीक, बबलू दरेकर, प्रशांत अधिक , विशाल मस्के , अमोल आदीक , सोमनाथ दौंड  ,सागर जगताप, कुणाल सूर्यवंशी, सागर उपळकर , अमोल पवार, राहुल पवार, आदींसह अनेक हिंदुत्ववादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post