श्रीरामपूर : सालाबादप्रमाणे श्रीरामपूर येथील शहराची मानाची दहीहंडी समजल्या जाणारी राम मंदीर चौकात दहीहंडी (गोपालकाला) साजरा केला जातो. या वर्षी समितिच्या बैठकीत सर्वानूमते या वर्षीच्या अध्यक्षपदी गणेश भिसेंचि निवड करण्यात आली.
अभिजित लिप्टे यांनि अध्यक्षपदाची सूचना मांडली. त्यास विशाल अंभोरे यांनी अनूमोदन दिले. यावेळी मनोज (भैय्या) भिसे, दत्तात्रय खेमनर, अजय छल्लारे, राहूल पांढरे, अक्षय गाडेकर, सिद्धार्थ सोनवणे, महेश उदावंत, अभिषेक माळवे, कमलेश भालदंड, अक्षय वर्पे आदी सदस्य उपस्थित होते.
गेल्या ११वर्षापासून मानाचि दहिहंडि उत्सवात साजरी करण्यात येती ह्या वर्षी दिनांक २८ ऑगस्ट २०२४ रोजी राम मंदिर चौक येथे सायंकाळी ६वाजता सर्व शहरवासीयांनि ऊपस्थित रहावे असे अहवान श्रीरामपूर दहिहंडि ऊत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे. दत्तात्रय खेमनर यांनी सर्वांचे आभार मानले.