विद्यार्थ्यांमध्ये व्यक्तिमत्व विकासाची पायाभरणी शालेय जीवनातच विकसित केली पाहिजे - सर्जेराव मते


कोपरगाव ( गौरव डेंगळे): आई-वडिलांनंतर शिक्षक हेच विद्यार्थ्यांचे खरे गुरु असतात. ते विद्यार्थ्यांना ज्ञानाबरोबर जगातील सर्व महत्त्वाच्या गोष्टींबद्दल ज्ञान देत असतात.विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचं कार्य देखील शिक्षक करत असतात.
             पुस्तकी ज्ञानाबरोबर विद्यार्थ्यांना जगातील प्रत्येक घडामोडीचा ज्ञान अवगत होण्याकरिता शिक्षक कायम प्रयत्नशील असतात आणि यातूनच विद्यार्थी कक्षामध्ये विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास होत असतो असे प्रतिपादन  सर्जेराव मते यांनी श्री शारदा इंग्लिश मीडियम स्कूल येथे व्यक्तिमत्व विकास व्याख्यानादरम्यान बोलताना केले.
         श्री शारदा इंग्लिश मिडियम स्कूल नेहमी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नवनवीन उपक्रम राबवता असते. आज इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी व्यक्तिमत्व विकास या विषयावर प्रसिद्ध व्याख्याते सर्जेराव मते यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.मते यांनी आपल्या मधुर वाणीने विद्यार्थ्यांना अभ्यास कसा करावा याविषयी मार्गदर्शन करताना संत तुकारामाच्या अभंगवाणीतून मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण म्हणजे विद्यार्थ्यांनी मन प्रसन्न करून अभ्यास केला पाहिजे तरच आपल्याला चांगले यश मिळेल हे सांगितले त्यासाठी सर्वांनी पहाटे सकाळी लवकर उठून आळस झटकून अभ्यास करावा हे सांगितले तसेच परीक्षेत प्रश्नपत्रिका सोडवताना सुरुवातीला सोपा प्रश्न सोडवावा व नंतर बाकीचे प्रश्न सोडवावेत याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.यावेळी व्याख्याते मते यांचे शाळेच्या वतीने प्राचार्य के एल वाकचौरे यांनी स्वागत केले. 
            संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता दहावीतील विद्यार्थिनी अक्षदा ढवळे हिने केले. मते यांनी अगदी गमतीदार पद्धतीने व्यक्तिमत्व विकास या विषयावर आपले मुद्दे मांडून विद्यार्थ्यांची उत्सुकता शेवटपर्यंत उत्साही ठेवली.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post