सेवानिवृत्त शिक्षक अनिल साळवेंकडुन श्रीरामपूर पालिका शाळा क्रमांक तीन मध्ये शैक्षणिक साहित्त्य वाटप : विद्यार्थ्यांची हायटेक शिक्षणाकडे वाटचाल ; विद्यार्थी संख्येत होतेय वाढ

स्व प्रभाकर साळवे यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त सेवानिवृत्त शिक्षक अनिल साळवे यांच्या वतीने शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्त्याचे नुकतेच वाटप करण्यात आले.

श्रीरामपूर : गोंधवणीतील महादेव मंदिरालगतच्या श्रीरामपूर पालिका शाळा क्रमांक तीन मधील विद्यार्थ्यांची हायटेक शिक्षणाकडे वाटचाल सुरु झाली आहे. शाळेत ई-लर्निंग, अत्त्याधुनिक शैक्षणिक सुविधा पुरविण्यात येत आहे. शिष्यवृत्ती परीक्षेच्या सरावासाठी व अभ्यासात मागे असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ज्यादा तासिका घेण्यात येत आहेत. भौतिक व शैक्षणिक सुविधा निर्माण झाल्याने एकंदरीत शाळेचे रुप पालटले आहे. पटसंख्येतही वाढ होत आहे. दरम्यान, शाळेच्या शैक्षणिक विकासात सामाजिक सहभाग वाढत आहे. स्व प्रभाकर साळवे यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त सेवानिवृत्त शिक्षक अनिल साळवे यांच्या वतीने शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्त्याचे नुकतेच वाटप करण्यात आले.

                  शहरातील पालिका शाळांमध्ये भौतिक, शैक्षणिक सुविधा उपलब्ध झाल्याने पालिका शाळांचे रूपच बदलले आहे. विद्यार्थीचा पालिका शाळांकडे ओढा वाढत आहे. शाळा क्रमांक ३ मध्ये मुला-मुलींना स्वतंत्र, सुसज्ज पाण्याच्या सुविधायुक्त शौचालय, स्वच्छतागृह करण्यात आले. प्रत्येक वर्गात इलएफडी व इंटरऍक्टिव्ह बोर्डच्या सहाय्याने ई-लर्निंग सुविधेचा वापर केला जात असल्याने विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक अभिरुची निर्माण होत आहे. मुलांना खेळण्यासाठी शालेय परिसरात खेळाचे साहित्त्यही बसविण्यात येणार आहे. श्रीरामपूर पालिका शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी संजीवन दिवे यांच्या संकल्पनेतुन निर्माण केलेला इंग्रजी वाचन व लेखनाचा 'संजीवन इंग्रजी वाचन प्रकल्प' शाळेत राबविला जात आहे. यावर्षीपासून इयत्ता पाहिलीला सेमी इंग्रजी वर्ग सुरु करण्यात आला आहे. शाळेसमोर मुलांना खेळण्यासाठी प्रशस्त मैदान उपलब्ध आहे. शाळेच्या आवारात पेविंग ब्लॉक बसविण्यात आले. वर्गखोल्यांना रंगरंगोटी करण्यात आली आहे. कंपाउंडचेही काम पूर्णत्वाकडे आहे. शाळेच्या परिसरात परसबाग लावण्यात येणार आहे.

  • शाळेतील शिक्षकवर्गांनी  दूरच्या वस्तीवरील विद्यार्थ्यांना ने-आण करण्यासाठी स्व:खर्चाने रिक्षाची व्यवस्था केली आहे.
  • शिष्यवृत्ती परीक्षेच्या सरावासाठी व अभ्यासात मागे असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शाळेतील शिक्षकांकडून ज्यादा तासिका घेण्यात येत आहेत.
  • इलएफडी व इंटरऍक्टिव्ह बोर्डच्या सहाय्याने ई-लर्निंग अध्यापन 
  • इयत्ता पाहिलीला सेमी इंग्रजी वर्ग चालू करण्यात आला आहे.
  • मुलांना शिक्षणाची गोडी वाढविण्यासाठी 'बाला' प्रकल्पाअंतर्गत शाळेच्या भिंतींवर अभ्यासविषयक बाबी रेखाटण्यात येऊन भिंती बोलक्या करण्यात येणार आहे. यामुळे मुलांना खेळता-खेळता स्वयंशिक्षण देण्याचा प्रयत्न राहील.
  • शाळेच्या प्रशस्त मैदानात मुलांना खेळण्यासाठी खेळाचे साहित्त्य बसविण्यात येणार आहे.


Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post