श्रीरामपूर : अहमदनगर जिल्ह्यातील राहाता-श्रीरामपुर हद्दीतील खंडाळा ते श्रीरामपूर प्रवरा कॅनॉललगतचे झाडांची कत्तल करण्यात आली असून, त्यात काही जंगली झाडे, कडुलिंबाचे झाडे हे बेकायदेशीर तोडण्यात आले असल्याचा आरोप छावा ब्रिगेड़चे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष राजेश शिंदे पाटिल यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी अहमदनगर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंत्यांकडे तक्रार केली आहे.
सध्या महाराष्ट्रावर गेल्या दोन ते तीन वर्षापासून दुष्काळ आहे. सध्या वन विभागाचा अमृत महोत्सव चालू आहे. त्यात आपल्या विभागाच्या माध्यमातून अशी वृक्षतोड होत असेल याचा अर्थ आम्ही काय समजायचं आणि वृक्ष प्रेमींनी काय समजायचं? असा सवाल राजेश शिंदे यांनी उपस्थित केला आहे.
वृक्षतोडीस जबाबदार असणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अन्यथा, छावा ब्रिगेडच्या वतीने हरित लवादा पुणे या ठिकाणी सर्व वृक्षप्रेमी शेतकरी यांना सोबत घेऊन तीव्र स्वरूपाचा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा छावा ब्रिगेड़चे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष राजेश शिंदे पाटिल यांनी दिला आहे.