श्रीरामपूर तालुक्यातील मालुंजा येथील जिल्हा परिषदेत प्राथमिक शाळेत तसेच गोखलेवाडी शाळा व श्रीरामपूर नगरपरिषद शाळा क्र.२ व ७ मधील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना वह्या, रंगपेट्या, चित्रकला वही आदींचे वाटप ज्येष्ठ नागरीक आनंद मेळावा या ज्येष्ठांच्या संघटनेने केले. त्यावेळी अध्यक्ष निकम हे बोलत होते. संघटनेचे सचिव प्रभाकर भोंगळे यांनी ज्येष्टांच्या संघटनेचे सभासद वर्गणी जमा करून दरवर्षी गरजु विद्यार्थ्यांना शालेय वह्या, पुस्तके देवून मदत करीत आहे. संघटनेचे कार्य हे सर्वांना प्रेरणादायी आहे.
याप्रसंगी साईग‘ुप व सावंता प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजयराव कुदळे, फुलांचे व्यापारी लक्ष्मणराव आगरकर, प्रकाशराव पिसे, एस. के. कुर्हे, अशोकराव ससाणे, बेलापूर एम. पी. सोसायटीचे संचालक पंडीतराव बोंबले, लेवीन भोसले, सोपानराव सानप, शैक्षणिक साहित्यचे किसनराव वमने, विजय भंडारी, दत्तात्रय बोंबले, सुरेंद्रनाना गिरमे, अशोकराव ससाणे, के. पी. बोरूडे, बाबासाहेब दिघे, अब्दुल पठाण, बाबा दळवी आदी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक‘माचे सूत्रसंचालन प्रा. सुभाष लिंगायत यांनी केले. जि. प. शाळेचे मु‘याध्यापक सुनील ओहळ यांनी आभार मानले. याप्रसंगी वरील शाळेचे मु‘याध्यापक, शिक्षक, शिक्षिका, शालेय समितीचे पदाधिकारी, ग‘ामस्थ उपस्थित होते.