कोपरगावातील श्री शारदा इंग्लिश मिडीयम शाळेत अवतरली पंढरी|


कोपरगांव (गौरव डेंगळे) : आषाढी एकादशीनिमित्त महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरीच्या पांडूरंगाची वारकरी दिंडी मोठया उत्साहात काढण्यात आली. 

                मंगळवार (१७) विठ्ठल नामाची शाळा भरली होती.शहरातील सोमैय्या विद्याविहार संचलित श्री शारदा इंग्लिश मिडीयम शाळेत आषाढी एकादशी निमित्त मंगळवारी सकाळी काढण्यात आलेल्या दिंडीत शाळेतील विद्यार्थ्यांनी वारकरी वेषभूषातून टाळमृदंगाच्या गजरात,अभंग, लेझीम नृत्य व भजने गात शहरातून फेरी काढण्यात आली.

               शाळेच्या प्रांगणात विठ्ठल रुक्माई यांच्या प्रतिमेस प्राचार्य के एल वाकचौरे, उपप्राचार्या सौ शुभांगी अमृतकर, सर्व पर्यवेक्षिका सौ प्रज्ञा पहाडे,सौ पल्लवी ससाणे,सौ नाथलीन फर्नांडिस यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण व पूजन करण्यात आले.दिडींचा समारोप अंभग गात रिंगण करून करण्यात आला.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post