प्राथमिक शिक्षक बँकेचे नूतन चेअरमन बाळासाहेब सरोदे यांचा सत्कार; श्रीरामपूर तालुक्यातील सर्व प्राथमिक शिक्षक संघटनांच्या वतीने सत्कार


श्रीरामपूर - अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या नूतन चेअरमनपदी श्रीरामपूरचे संचालक बाळासाहेब सरोदे यांची निवड झाल्याबद्दल शिक्षक बँकेच्या श्रीरामपूर शाखेत सत्कार समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता

               कार्यक्रमाच्या सुरुवातीला गुरुमाऊली - सदिच्छा मंडळाचे तालुकाध्यक्ष संतोष वाघमोडे यांनी सर्वांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाशिक विभाग शिक्षक संघाचे कार्याध्यक्ष सय्यद जब्बार होते. यावेळी श्रीरामपूर तालुक्याला चेअरमनपदाची संधी मिळाल्याबद्दल श्रीरामपूर तालुक्यातील सर्व शिक्षक संघटनांच्या वतीने बाळासाहेब सरोदे यांचा सपत्नीक सत्कार व अभिनंदन करण्यात आले.
                विकास मंडळाचे माजी अध्यक्ष सुनिल गिरमे यांनी आपल्या मनोगतातून बाळासाहेब सरोदे यांच्यासारख्या सर्वसामान्य व संघटना चळवळीतील प्रामाणिक कार्यकर्त्याची आशिया खंडातील सर्वात मोठ्या प्राथमिक  शिक्षक सहकारी बँकेच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले. इब्टा संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष विजय काटकर यांनी नूतन चेअरमन सरोदे यांनी बँकेचा आदर्शवत सभासदभिमुख कारभार करावा अशी अपेक्षा व्यक्त करून त्यांच्या भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.शिक्षक बँकेचे माजी व्हा.चेअरमन नानासाहेब बडाख यांनी गेली अनेक वर्ष प्राथमिक शिक्षक संघटनेतील चळवळीच्या सर्वसामान्य शिलेदराची चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले.

                 सत्काराला उत्तर देताना चेअरमन बाळासाहेब सरोदे यांनी सर्वांना विश्वासात घेऊनच बँकेचा सभासादाभिमुख कारभार करणार असल्याची ग्वाही दिली.तसेच यावेळी सय्यद जब्बार,सेवानिवृत्त केंद्रप्रमुख उत्तमराव शेलार,संजय लोंढे,महादेव गर्जे,विनोद राऊत,अल्ताफ शहा,बाळासाहेब गायकवाड,शाम पटारे यांनी आपल्या मनोगतातून चेअरमन सरोदे सर यांच्या शिक्षक संघटना चळवळीतील कार्याचा गौरव करून सभासद हिताच्या कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

                यावेळी कार्यक्रमाला राज्य संघाचे उपाध्यक्ष कैलास चिंधे, नाशिक विभाग संघाचे कार्याध्यक्ष सय्यद जब्बार, बँकेचे माजी व्हा.चेअरमन नानासाहेब बडाख, इब्टा संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष विजय काटकर, बामसेफचे राज्यनेते रमेश मकासरे, प्रोटॉन संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनोद राऊत, शिक्षक नेते अल्ताफ शहा, सुनिल गिरमे, उत्तमराव शेलार, अर्जुन बडोगे, संजय वाघ, महादेव गर्जे, संतोष वाघमोडे, शाम पटारे, शाकीर शेख, रविंद्र कांबळे, एकनाथ आव्हाड, आप्पासाहेब जाधव, गणेश पिंगळे, अरुण कवडे, विश्वास जगन्नाथ, प्रविण बडाख, आदिनाथ तांबे, अनंत गोरे, बाबासाहेब पिलगर, राजू थोरात, निलेश राजवळ, संजय लोंढे, बापूसाहेब सरोदे, अनिल गायकवाड, बाळासाहेब गायकवाड, सुजित बनकर, बाळासाहेब पाटोळे, राजू बनसोडे, बाबासाहेब जाधव, रामनाथ पिलगर, यशवंत बागुल, अमोल गट, विनायक आढाव, नंदकुमार बनसोडे, रंगनाथ देठे, नितीन म्हसे, प्रितम मेहेरखांब आदि उपस्थित होते.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post