विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.अनेक वेळा पक्ष्यांना पाणी आणि अन्नासाठी भटकंती करावी लागते.अनेकदा त्यांना पाणी न मिळाल्याने त्यांचा मृत्यू होतो. अन्न आणि पाण्याअभावी पक्ष्यांचा मृत्यू होऊ नये म्हणून प्रायमरी सुपरवायझर पल्लवी ससाणे यांच्या मार्गदर्शनाखाली व कलाशिक्षक मंगेश गायकवाड यांच्या सहकार्याने आईस्क्रीमच्या टाकाऊ काड्या पासून पक्षांसाठी रंगीबिरंगी घरटे इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांकडून तयार करून घेतले व शाळेतील प्रत्येक झाडावर पक्षांसाठी घरटे बांधून त्यात अन्न पाण्याचीही सोय केली आहे.या घरट्यांमध्ये विविध प्रकारचे पक्षांसाठी धान्य ठेवण्यात आले आहे. यामुळे रोज सकाळी वृक्षांवर बुलबुल, मैना,पारवा, कबुतर, राघू, चिमण्या नेहमी येता असतात.
पक्षांची घटती संख्या व अन्नासाठी त्यांची होणारी भटकंती लक्षात घेता अशा प्रकारचे उपक्रम प्रत्येक ठिकाणी राबवावे असे आवहान शाळेचे प्राचार्य के एल वाकचौरे यांनी केले.या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी सर्वांना संदेश दिला आहे की आपण नियमित पशु-पक्षांना मदत करावी.