श्रीरामपूर : पीएम श्री नगरपालिका शाळा क्रमांक ७ श्रीरामपूर येथे नवगतांचा प्रवेशोत्सव ढोल ताशांच्या गजरात प्रभात फेरी काढून उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमात श्रीरामपूर नगरपरिषद शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी संजीवन दिवे यांनी सहभाग घेऊन नवीन विद्यार्थ्यांना व पालकांना संबोधन केले. शाळेविषयी नवीन संकल्पना व विद्यार्थी हिताच्या करण्यात येणाऱ्या नवनवीन योजनांचा आढावा दिला. तसेच शाळेच्या शिक्षकांनी पीएम श्री अंतर्गत शाळेत केलेल्या वेगवेगळ्या भौतिक सुविधांची माहिती दिली.
संपूर्ण शाळेची रंगरंगोटी करण्यात आली आहे. शाळेत परसबाग बनवण्यात आली आहे यामध्ये सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या सर्व फळभाज्या व पालेभाज्यांचा उपयोग विद्यार्थ्यांच्या मध्यान भोजनामध्ये करण्यात येत आहे. विद्यार्थी उपयोगी दर्जेदार शैक्षणिक साधने निर्माण केली आहेत. नवीन बेंचेस शाळेला मिळाले आहे. संपूर्ण शाळा विविध झाडांनी नटलेली खऱ्या अर्थी ग्रीन स्कूल झाली आहे. प्रत्येक वर्गात इंटरऍक्टिव्ह बोर्ड तसेच एल एफ डी बसवण्यात आले आहे त्यामुळे खऱ्या अर्थी शाळा शंभर टक्के डिजिटल झाली आहे. या वर्षात शाळेला कॉम्प्युटर लॅब सायन्स लॅब व सुसज्ज वाचनालय पीएम श्री अंतर्गत मिळणार असल्याचे सांगितले. या शैक्षणिक वर्षांमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांना योगा व क्रीडा यांचे धडे देण्यासाठी नवीन योगा व क्रीडा शिक्षकांची नेमणूक करण्यात येणार आहे. या सर्व शैक्षणिक सोयींचा फायदा मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांना व पालकांना मिळावा असा मनोदय शाळेतील शिक्षकांनी व्यक्त केला.
यावेळी शिक्षण मंडळाचे किशोर त्रिभुवन, श्ररुपेश गुजर, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ कल्पना जगताप, शिक्षक प्रशांत पठाडे, सौ.वर्षा वाकचौरे, श्री अजय धाकतोडे यांसह पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यक्रमाचे प्रस्ताविक श्री प्रशांत पठाडे सर, सूत्रसंचालन श्री अजय धाकतोडे सर केले. तसेच सौ वर्षा वाकचौरे मॅडम यांनी उपस्थितांचे आभार मानले.