श्रीरामपूर | तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा नायगाव जुने शाळेत दहावा जागतिक योग दिन उत्साहात संपन्न झाला.योगदिनाच्या निमित्ताने शाळेचे शिक्षक संतोष वाघमोडे यांनी योगाचे मानवी जीवनातील महत्व विशद करून सुक्ष्म हालचाली, योगासने, प्राणायाम प्रात्यक्षिके करून दाखवली व मुलांनी अतिशय शिस्तबद्धपणे योगासने केली.
योगदिनानिमित्त सुरुवातीला नायगावचे सरपंच डॉ.राजाराम राशिनकर यांनी योगासने,व्यायाम व योग्य आहाराचे जीवनातील महत्व याबाबत मार्गदर्शन केले.यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष निलेश लांडे,माजी अध्यक्ष संतोष राशिनकर व पालक उपस्थित होते.
योगदिन व वटपौर्णिमेचे औचित्य साधून नायगाव ग्रामपंचायतच्यावतीने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक पेरूचे रोपटे देण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे विद्यार्थी, शिक्षिका सुजाता सोळसे, मुख्याध्यापक संतोष वाघमोडे यांनी विशेष प्रयत्न केले.