या निवेदनात म्हटले आहे की, परिवहन आयुक्त कार्यालय मुंबई यांच्या 18/5/2024 च्या परिपत्रकाप्रमाणे योग्यता प्रमाणपत्र विलंब प्रतिदिन पन्नास रुपये दंड वसूल करण्याचे काम सुरू केले आहे. हा दंड घेणे अन्यायकारक आहे. तरी वाहतूक व्यवसायाचे कंबरडे मोडणारा आहे. मुळातच महाराष्ट्र शासनाने एसटी बस यामध्ये महिलांना 50 % व जेष्ठ नागरिकांना 100 % सूट दिल्यामुळे आमच्या रिक्षा व्यवसाय करणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. तरी शासनाने पन्नास रुपये प्रतिदिन दंड आकारणे बंद करावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.
निवेदनावर अध्यक्ष शंकराव लबडे, उपाध्यक्ष अशोक सोनवणे, सिताराम देवकर, गणेश पवार, रवींद्र वाकचौरे, जालिंदर बोर्डे, आरिफ शेख, पिरमहोम्मद जहागिरदार ज्ञानेश्वर जगताप, भास्कर शिंदे, पप्पू शिंदे, रावसाहेब जाधव, रावसाहेब उंद्रे, बाळासाहेब वारे, राम भरोसे, मच्छींद्र शेळके, भिकन सय्यद आदींची नावे आहेत.
निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, श्री. एकनाथ शिंदे, राज्यपाल, परिवहन आयुक्त, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, जिल्हा अधिकारी, पोलीस अधीक्षक साहेब आदींना पाठविण्यात आल्या आहेत.