लोकसभेच्या निवडणुकीनंतर धनगर समाज हा महायुतीसोबत येण्यासाठी तयार नसल्याने महाराष्ट्रातील एकही धनगर समाजाचा खासदार दिलेला गेला नाही. ही समाजाच्या मनामध्ये खंत असल्याने धनगर समाजाचे दिल्लीमध्ये नेतृत्व करण्यासाठी महाराष्ट्र श्री दत्ताभाऊ खेमनर बापूसाहेब शिंदे या दोन नावाचा पक्षाकडून राज्यसभेसाठी विचार सुरू आहे.
दत्ताभाऊ खेमनर यांना राज्यसभांना मिळाल्यास त्यांना विधान परिषद मिळू शकते. अशी संपूर्ण महाराष्ट्रातील धनगर समाजामध्ये मोठी चर्चा आहे . यासंदर्भात वरिष्ठ नेत्यांकडून त्यांच्या कामाचा अहवाल मागवण्यात आला आहे. त्यांच्या कामाची दखल घेऊन लवकरच त्यांना राज्याच्या राजकारणामध्ये मोठी संधी मिळण्याची शक्यता आहे सध्या ते भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे सचिव म्हणून कार्यरत आहे अखिल भारतीय धनगर समाज विकास परिषदेचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष असल्याने महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यामध्ये त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे याचा फायदा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला होण्यासाठी दत्ता खेमनर यांच्या नावाची चर्चा आहे मुख्यमंत्र्यांचे निकटवर्गीय यांच्याकडून देखील खेमनर यांच्या नावाची शिफारस होत आहे दत्तात्रय खेमनर हे संघ विचारधारेचे असल्याने त्यांना विधान परिषद मिळण्याची दाट शक्यता आहे महाराष्ट्रातील धनगर समाजाला खुश करण्यासाठी दत्तात्रय खेमनर यांना विधानपरिषद मिळू शकते दत्ताभाऊ खेमनर यांना विधानपरिषद अखिल भारतीय धनगर समाज विकास परिषदेचे शिष्टमंडळ लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे.