त्यानुसार योगाचे महत्व प्रचार आणि प्रसार करण्याच्या हेतूने तालुक्यातील सर्व शाळेमध्ये सकाळी 7 ते 9 या वेळेमध्ये योग प्रात्यक्षिकांचे यशस्वी आयोजन करण्यात आले. यामध्ये विविध प्रकारचे व्यायाम प्रकार, योगासने, प्राणायाम घेण्यात आले.
या अनुषंगाने गटशिक्षणाधिकारी त्र्यंबक पोले यांनी स्वतः मालेगाव व पाचलेगाव येथे योग प्रात्यक्षिकामध्ये सहभाग नोंदवला. योग दैनंदिन अभ्यास आणि एकंदरीत जीवन या विषयी मार्गदर्शन केले. जीवनामध्ये चांगल्या सवयी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. यासोबत प्रत्येक बालकाने आपले आई-वडील, आजी-आजोबा, आपले गुरुजन आणि ज्येष्ठ-वरिष्ठ यांचा आदर केला पाहिजे. त्यांनी सांगितलेल्या बाबी समजून घेतल्या पाहिजेत. त्यांच्या अनुभव संपन्न ज्ञानाने आपले जीवन समृद्ध केले पाहिजे.
ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी ज्ञानोबा साबळे व मंगेश नरवाडे यांच्यासह सर्व केंद्रप्रमुख, सर्व साधनव्यक्ती यांनी विविध शाळेमध्ये योग शिबिरात सहभाग नोंदवला.